वॉशिंग्टन डी. सी -कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरामध्ये आतापर्यंत 83 लाख 92 हजार 582 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
Global Covid 19 Tracker: जगभरात 83 लाख 92 हजार कोरोनाबाधित रुग्ण - number of global coronavirus deaths
कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरामध्ये आतापर्यंत 83 लाख 92 हजार 582 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
अद्ययावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 83 लाख 92 हजार 582 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 4 लाख 50 हजार 452 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 44 लाख 5 हजार 312 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.
कोरोनाच्या अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात जास्त मृत्यू अशा रुग्णांचेच नोंदविले गेले आहेत. तर दरम्यान देशातून कोरोना महामारीचा संपूर्णपणे नायनाट झाल्याचे जाहीर करणारा स्लोव्हेनिया हा पहिला युरोपियन देश ठरला आहे.