महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / headlines

प्रसिद्ध जॉकी संदेश आखाडे यांनी घेतले माथेरानमधील 20 घोडे दत्तक - Lockdown effect on matheran

माथेरान सध्या पर्यटकांसाठी बंद आहे. या ठिकाणी पर्यटक येत नसल्याने येथील घोडेवाल्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. त्यामुळे गोरगरीब असलेल्या घोडे मालकांना आपला घोडा सांभाळायचा कसा? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ही बाब लक्षात येताच संदेश आखाडे याने मदतीचा हात पुढे केला

 जॉकी संदेश आखाडे यांनी घेतले माथेरानमधील 20 घोडे दत्तक
जॉकी संदेश आखाडे यांनी घेतले माथेरानमधील 20 घोडे दत्तक

By

Published : May 1, 2021, 12:51 PM IST

रायगड - थंड हवेचे ठिकाणी म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. मात्र कोरोना महामारीमुळे माथेरान बंद आहे. या ठिकाणी पर्यटक येत नसल्याने येथील घोडेवाल्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली असून गोरगरीब घोडे मालकांना आपला घोडा सांभाळायचा कसा? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अशा काळातच सामाजिक बांधिलकी जपत प्रसिद्ध जॉकी माथेरानचा सुपुत्र संदेश तुकाराम आखाडे यांनी माथेरान मधील 20 घोडे दत्तक घेतले आहेत.

20 घोड्यांचा दोन महिन्यांचा संपूर्ण खर्च करणार-

माथेरान हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. मात्र कोरोना महामारीमुळे माथेरान सध्या पर्यटकांसाठी बंद आहे. या ठिकाणी पर्यटक येत नसल्याने येथील घोडेवाल्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. त्यामुळे गोरगरीब असलेल्या घोडे मालकांना आपला घोडा सांभाळायचा कसा? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ही बाब लक्षात येताच संदेश आखाडे याने मदतीचा हात पुढे केला. येथील 20 घोडे सांभाळण्यासाठी त्याने दत्तक घेतले, 2 महिने त्यांचे पालन पोषण यापुढे संदेश स्वतःच्या खर्चातून करणार आहे. त्याच्या या निर्णयामुळे सर्व घोडे मालकांनी संदेशचे आभार मानले आहेत.

घोड्यासाठी लागणारे खाद्य झाले माथेरानमध्ये दाखल

संदेशचे वडील तुकाराम आखाडे हे कर्जत तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष असून समाजासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळात आपल्या समाजबांधवाना एक हात मदतीचा म्हणून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला असून यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून तुकाराम आखाडे यांची समाजाप्रति असलेली तळमळ यातून दिसून येते.

ABOUT THE AUTHOR

...view details