मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने सुनील मानेची एनआयए कोठडी 1 मे पर्यंत वाढवली आहे. मनसुख हिरेन खून प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील माने यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, अशी माहिती एनआयएने न्यायालयात दिली.
एनआयएने बुधवारी इन्स्पेक्टर सुनील माने यांना न्यायालयात हजर केले असता, एनआयएने सांगितले की सुनील माने 4 मार्च रोजी संध्याकाळी आपल्या कार्यालयात नव्हते, तर मनसुखची हत्या झाली तेव्हा ठाण्यात गेले होते.
एनआयएच्या वकिलाने न्यायालयास सांगितले की 4 मार्च रोजी सुनील माने यांनी आपला मोबाइल बंद केला आणि तो आपल्या बॅगमध्ये ठेवला होता. तसेच ती बॅग त्याच्या कार्यालयात म्हणजे कांदिवलीच्या गुन्हे शाखेत ठेवली होती. यानंतर त्यांनी आपल्या एका सहकाऱ्यास ती बॅग आपल्या घरी घेऊन जाण्यास सांगितले होते.