रिओ दि जनेरिओ (ब्राझील) - ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेइर बोल्सोनारो यांच्या पत्नी मिशेल बोल्सोनारो यांना कोरोनाची लागण झाली आहे. मिशेल यांच्यासह विज्ञान, तंत्रज्ञान मंत्री मार्कोस पोन्टेस यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. ही महिती राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जेइर बोल्सोनारो यांचा ही काही दिवसांपूर्वी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
मी ठीक आहे, थोडी सर्दी आणि डोकेदुखीची काही लक्षणे आहेत. क्वारंटाइन असून सर्व काही ठीक होईल, असे त्यांनी मार्कोस पोन्टेस यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, जेइर बोल्सोनारो यांच्या जवळच्या तीन सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.