मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हिचा आज (16 जुलै) वाढदिवस असून 37 वर्षांची झाली आहे. नमस्ते लंडन, अजब प्रेम की गजब कहानी, जब तक है जान, एक था टायगर, टायगर जिंदा है, भारत अशा अनेक चित्रपटांतून अभिनय करत कॅटरिनाने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
#HappyBirthdayKatrinaKaif : बॉलिवूडची चिकनी चमेली कॅटरिना कैफचा आज वाढदिवस - बॉलिवूडची चिकनी चमेली कॅटरिना कैफ
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हिचा आज (16 जुलै) वाढदिवस असून 37 वर्षांची झाली आहे. बॉलिवूडची चिकनी चमेली कॅटरिना कैफनं आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं अनेकांची मनं जिंकली.
कॅटरिना कैफचा 1984मध्ये आजच्याच दिवशी हाँगकाँगमध्ये जन्म झाला होता. भारतीय वंशाचे मोहम्मद कैफ आणि ब्रिटिश वंशाची सुजैन टरकोट यांच्या पोटी जन्मलेल्या कॅटरिनाला लहानपणापासूनच ग्लॅमरचे जग खुणवत होते. कॅटरिनाला सहा बहिणी आणि एक भाऊ आहे. सुरवातील कॅटरिना आईचे आडनाव लावायची. मात्र, ते उच्चारासाठी कठीण असल्याने तिने आडनाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि वडिलांचे आडनाव लावण्यास सुरुवात केली.
बॉलिवूडची चिकनी चमेली कॅटरिना कैफनं आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं अनेकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री होण्याआधी कॅटरिनाने मॉडेलिंग केलं. तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारली होती. दिग्दर्शक कैझाद गुस्ताद यांनी कॅटरिनाला ‘बूम’ या चित्रपटात अभिनेत्री म्हणून 2003ला तिला लाँच केले होते. त्यानंतर तीने बघता बघता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून मिरवण्याचा पल्ला गाठला.