वाशिम - जिल्ह्यातील मेडशी येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चोरी झाली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ माजली आहे.
अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरी; शेजारी दुकानही फोडले - washim
जिल्ह्यातील मेडशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फोडली. त्याचबरोबर बँकेशेजारील इलेक्ट्रॉनिक दुकानही फोडले. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
सध्या जिकडेतिकडे चोरीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. अशीच एक घटना जिल्ह्यात मेडशी येथे घडली. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फोडून त्यातील रक्कम लंपास केली. याचबरोबर बँकेच्या शेजारी असलेले यादव इलेक्ट्रॉनिक दुकानही फोडण्यात आले आहे. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली असून गावकऱ्यांनी बँक परिसरात एकच गर्दी केली आहे.
सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बँकेतील नेमकी किती रक्कम चोरी झाली याचा तपास पोलीस करीत आहेत. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...