महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / headlines

Accident of Two Trucks: दोन ट्रकचा भीषण अपघात; बिहारमधील तिघांचा मृत्यू - दोन ट्रकचा भीषण अपघात

भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6 वर जवाहरनगर (खरबी) गावाजवळ भारत पेट्रोल पंपाजवळ तालुक्यातील जवाहरनगर (खरबी) जवळील भारत पेट्रोलपंपजवळ उभ्या असलेल्या ट्रकला ( Accident of Two Trucks ) रायपूरकडून नागपूरच्या ( Nagpur ) दिशेला जात असलेल्या भरधाव ट्रकने मागून धडक दिली. हा अपघात पहाटे 4 वाजेच्या सुमारास झाला आहे. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाचा उपचारादरम्यान ( Three died on the spot ) दगावला आहे.

Accident of Two Trucks
दोन ट्रकचा भीषण अपघात

By

Published : Jul 9, 2022, 10:43 PM IST

भंडारा -तालुक्यातील जवाहरनगर (खरबी) जवळील भारत पेट्रोलपंपजवळ उभ्या असलेल्या ट्रकला रायपूरकडून नागपूरच्या दिशेला जात असलेल्या भरधाव ट्रकने ( Accident of Two Trucks ) मागून धडक दिली. हा अपघात पहाटे 4 वाजेच्या सुमारास झाला आहे. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाचा उपचारादरम्यान ( Three died on the spot ) दगावला आहे. भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6 वर जवाहरनगर (खरबी) गावाजवळ भारत पेट्रोल पंपाजवळ रस्त्यालगत पहाटे चार वाजेदरम्यान भीषण अपघात झाला आहे. लाल रंगाची माती वाहतूक करणारा ट्रक (GJ 36 v 9495 ) हा काही कारणास्तव रस्त्यावर उभा होता. नेमके त्याच वेळेला रायपूर वरून नागपूरकडे लोखंडाची वाहतूक करणारा ट्रक (CG 04 JC 4013) येत होता. त्यावेळी ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली दिली. धडक इतकी भीषण होती की, ट्रकमधील लोखंड केबिनच्या बाहेर निघाले होते.

तिघेही बिहारमधील रहिवासी - घटनेची माहिती मिळताच जवाहर नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटवास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमींना ट्रकमधून बाहेर काढले. मात्र, अपघातात क्लीनर रोहीत हिरालाल पटेल (वय 22 वर्षे), मुरारी दिलीप सिंग (वय 28 वर्षे), दोन्ही रा. गोपालगंज बिहार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, चालक शत्रुघन प्रभु प्रसाद (वय 30 वर्षे) रा. गोपालगंज बिहार हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नागपूरला नेत असतांना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. या अपघात नंतर काही काळ वाहतूक खोडांबली होती. नंतर दोन्ही ट्रकला क्रेनच्या साहाय्याने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

हेही वाचा -Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राणांचा कार्यकर्ता; फेसबूकवर नवनीत राणांच्या अनेक पोस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details