सातारा - जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाने तब्बल 58 रुग्णांचा बळी घेतला. गेल्या वर्षभरातील हा मृतांचा सर्वांत मोठा आकडा आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्याबरोबरच मृतांची संख्या घटवण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.
58 पैकी 17 मृत्यू कराडचे-
बुधवारी आलेल्या अहवालानुसार 24 तासात तब्बल 2 हजार 376 नागरिक कोरोनाबाधित आले. या मृतांमध्ये सर्वाधिक कराड तालुक्यातील 17 बाधितांचा समावेश आहे. तालुक्यात आत्तापर्यंत 469 जणांना कोरोनाने जीव गमवावा लागला आहे. सातारा तालुक्यात मंगळवारी 12 बाधितांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत 793 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
एकूण 2 हजार 700 जणांचे बळी
याशिवाय बुधवारी झालेले मृत्यू आणि आज पर्यंत एकूण(कंसात दिलेले) झालेलं मृत्यू पुढील प्रमाणे.
जावली 0 (106), खंडाळा 3 (88), खटाव 5 (278), कोरेगांव 5 (249), माण 4 (151), महाबळेश्वर 0 (34), पाटण 3 (123), फलटण 0 (194) व वाई 9 (215) असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 700 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
एकूण 1 लाख 14 हजार 242 बाधित
तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या
बुधवारची बाधित रुग्ण संख्या आणि एकूण बाधित रुग्ण कंसामध्ये पुढील प्रमाणे.
जावली 128 (5442), कराड 310 (17006), खंडाळा 183 (7058), खटाव 215 (9753), कोरेगांव 193 (9616), माण 151 (7288), महाबळेश्वर 27 (3432), पाटण 153 (4683), फलटण 410 (14783), सातारा 409 (25990), वाई 175 (8584 ) व इतर 22 (607) असे आज अखेर एकूण 1 लाख 14 हजार 242 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.