पुणे - एखाद्या आजाराने बेजार होऊन आपल्या घरापासून किंवा आपल्या नात्यातील माणसांपासून दूर येऊन त्या आजाराशी लढताना अनेकांचे निधन हे फूटपाथवर किंवा रस्त्याच्या कडेला होते. या बेवारस मृतदेहांवर त्यांच्याच आपल्या माणसांकडून अंत्यसंस्कार होतील इतक देखील त्यांचे नशीब नसत, ही बाब जरी काळजाला वेदना देणारी असली तरी हे आजच्या समजातलं सत्य आहे. हे ही तितकंच खरं.
२४४ बेवारस मृतदेहांचा अंत्यसंस्कार -
पुणे शहरात गेल्या वर्षभरात तब्बल २४४ बेवारस मृतदेह आढळून ( Funeral of Unclaimed Bodies in Pune ) आलेत. त्यांची ओळख पटू न शकल्याने शेवटी त्यांच्यावर महापालिकेकडूनच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे शहरात वेगवेगळ्या शहरातून अनेक जण येत असतात. बरेच जण हे घरच्यांशी झालेल्या वादातून घर सोडून येतात, अनेक लोकांना हे त्यांच्याच घरचेच सांभाळायला तयार नसतात म्हणून पुण्यात येतात. त्यातच काही ज्येष्ठ नागरिक आपल्याला संभाळण्याचा त्रास हा आपल्या घरच्यांना होऊ नये म्हणून आपणच आपल घर सोडून निघून येतात. काही लोकांचे आजाराने तर काहींचे वृध्पकाळाने निधन होते मग अशांचा अंत्यविधी करणार कोण? असा प्रश्न उभा राहतो.
मरणा नंतरही हाल संपेना -
मग अशा वेळी पुढे येत ते प्रशासन. अशा बेवारस निधन झालेल्यांची ओळख पटवण्यासाठी मृत्यू झाल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना कळविली जाते. पोलीस मग संबंधित ठिकाणी जाऊन त्यांचा मृतदेह प्रामुख्याने ससून रुग्णालयात आणतात. तेथे डॉक्टरांकडून तपासणी झाल्यावर त्यांना मृत घोषित केले जाते. ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून मृतदेह जतन करण्यासाठी ससून हॉस्पिटलला पत्र दिले जाते.