महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / headlines

सिंधुदुर्गमधून झारखंडचे 1545 नागरिक श्रमिक रेल्वेने झाले रवाना - Migrant workers left Sindhudurg

राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून आज सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकातून झारखंड राज्यातील हातिया स्थानकाकडे विशेष श्रमिक विशेष रेल्वे रवाना करण्यात आली. जिल्ह्यातून सोडण्यात आलेल्या या चौथ्या श्रमिक रेल्वेतून 1 हजार 545 कामगार झारखंडकडे रवाना झाले.

श्रमिक रेल्वे
श्रमिक रेल्वे

By

Published : May 24, 2020, 10:34 AM IST

सिंधुदुर्ग - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडण्याकरीता सरकारने श्रमिक रेल्वे आणि बसेसची व्यवस्था केली. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून आज सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकातून झारखंड राज्यातील हातिया स्थानकाकडे विशेष श्रमिक विशेष रेल्वे रवाना करण्यात आली. जिल्ह्यातून सोडण्यात आलेल्या या चौथ्या श्रमिक रेल्वेतून 1 हजार 545 कामगार झारखंडकडे रवाना झाले.

संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून मजूर व कामगार यांना एस.टी. बसने सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. त्यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील 237 मजूर हे 12 बसमधून, मालवण येथील 491 मजूर हे 25 बसमधून, कुडाळमधील 372 मजूर हे 22 बसमधून, सावंतवाडी येथील 384 मजूर हे 19 बसधून, देवगडमधील 37 मजूर हे 2 बसेसमधून आणि वैभववाडी तालुक्यातील 24 जण एका बसमधून असे एकूण 81 बसमधून 1 हजार 545 मजूर सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, सुशांत खांडेकर, उपजिल्हाधिकारी प्रशांत ढगे, सावंतवाडी पोलीस उपअधीक्षक शिवाजी मुळीक, यांच्यासह स्टेशन मास्तर वैभव दामले, संबंधित तालुक्यांचे तहसrलदार आदी उपस्थित होते.

रेल्वेमध्ये सोशल डिस्टन्संगिंचे उल्लघंन होऊ नये, तसेच कोणताही गोंधळ उडू नये, यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली 10 पोलीस अधिकारी व 70 पोलीस कर्मचारी तैनात होते. सोशल डिस्टंसिंगचे पालन करत प्रवाशांना खाद्य पाकीटे व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details