महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

युझवेंद्र चहल आणि धनश्रीच्या नात्यात दुरावा, चाहत्यांचे डोळे विस्फारले - yuzvendra chahal shares cryptic post

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्रीच्या नात्यात दुरावा तयार झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियातून वाचायला मिळत आहे. त्यांच्यात काही खरंच बिनसलंय का हे जाणून घेऊयात.

Etv Bharat
युझवेंद्र चहल आणि धनश्री

By

Published : Aug 18, 2022, 1:43 PM IST

मुंबई- टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल त्याच्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. चहलची पत्नी आणि सर्वोत्कृष्ट नृत्यांगना धनश्री वर्मा सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि तिचे डान्स व्हिडिओ शेअर करून चाहत्यांची मने जिंकत असते. चहल आणि धनश्रीसोबतचे व्हिडिओ देखील चाहत्यांचे खूप मनोरंजन करतात. आता दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे दिसून येत आहे.

धनश्रीने आडनाव वगळल्यानंतर युझवेंद्र चहलने लिहिली गुढ पोस्ट

धनश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज काहीतरी शेअर करत असते. धनश्रीला सोशल मीडियावर 5 मिलियनहून अधिक चाहते फॉलो करतात. आता असे वृत्त आहे की धनश्रीने इन्स्टा बायोमध्ये तिच्या नावाच्या मागे पती चहलचे आडनाव काढून टाकले आहे. यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या असून या दोघांमध्ये काहीतरी घडले असावे असा अंदाज बांधला जात आहे.

चहलच्या पोस्टमुळे धमाका - धनश्रीनंतर चहलच्या सोशल मीडियावरच्या पोस्टनेही धमाका केला आहे. खरंतर चहलने त्याच्या इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट टाकली होती, ज्यामध्ये त्याने लिहिले होते, नवीन आयुष्य सुरू होत आहे. आता या पोस्टमुळे दोघांमध्ये काहीतरी गडबड असल्याची चाहत्यांना खात्री पटली आहे. मात्र, सोशल मीडियावर या जोडप्याच्या हालचालींवरून काहीही स्पष्ट झालेले नाही.

कुठे भेटले होते - युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची पहिली भेट एका ऑनलाइन क्लासमध्ये झाली होती. खरंतर चहलला डान्स शिकायचा होता आणि तो धनश्री वर्माच्या क्लासला जॉईन झाला होता. यानंतर इथून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. धनश्री एक ट्रेंड डान्सर आहे आणि तिचे स्वतःचे YouTube चॅनल आहे, ज्याचे 26 लाख सदस्य आहेत.

हेही वाचा -एस एस राजामौलीचे शिष्य अश्विन गंगाराजू दिग्दर्शित १७७० या चित्रपटाचे मोशन पोस्टर झाले लाँच

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details