महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 4, 2022, 10:36 AM IST

ETV Bharat / entertainment

Gauri Movie : नव्या जोडीची अफलातून केमिस्ट्री, रोमँटिक 'गौरी' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटांमधून नवनवीन जोड्या प्रेक्षकांसमोर येत असतात. बऱ्याचदा त्या जोड्या प्रेक्षकप्रिय होतात. एक अशीच नवीन रोमँटिक जोडी गौरी मधून प्रेक्षकांना रिझवायला येत आहे. ती म्हणजे मयुरेश पेम (Mayuresh Pem) आणि नम्रता गायकवाड (Namrata Gaikwad). गौरी चित्रपटाचे (Gauri Movie Poster released) पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले असून या जोडीच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा आहे.

Gauri Movie
गौरी चित्रपट

मुंबई: चित्रपटांमधून नवनवीन जोड्या प्रेक्षकांसमोर येत असतात. बऱ्याचदा त्या जोड्या प्रेक्षकप्रिय होतात. एक अशीच नवीन रोमँटिक जोडी गौरी मधून प्रेक्षकांना रिझवायला येत आहे. ती म्हणजे मयुरेश पेम (Mayuresh Pem) आणि नम्रता गायकवाड (Namrata Gaikwad). गौरी चित्रपटाचे (Gauri Movie Poster released) पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले असून या जोडीच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा आहे.

माणूस जिवंतच नसेल तर?:अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, पण त्या गरजा माणूस जिवंत असेल तर आहेत. माणूस जिवंतच नसेल तर? (What if the man is not alive) त्याला कोणती गरज भासेल...? याचा विचार करायला लावणारा चित्रपट म्हणजे गौरी (Gauri Movie). युक्ता प्रॉडक्शन्स आणि द्विजराज फिल्म्सचे निर्माते प्रवीण बालाप्रसादजी बियाणी, दत्तात्रय जाधव यांची निर्मिती असलेल्या गौरी या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन पांडुरंग बाबुराव जाधव यांनी केले आहे.

उत्सुकता निर्माण झाली:स्वतःच्या समाजाला वाचवण्यासाठी डॉक्टर होऊ पाहणाऱ्या तरुणाला येणाऱ्या समस्या गौरी हा चित्रपट मांडतो. सकस कथा, दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

नव्या जोडीची अफलातून केमिस्ट्री: अभिनेता मयुरेश पेम आणि अभिनेत्री नम्रता गायकवाड या नव्या जोडीची अफलातून केमिस्ट्री गौरी (Mayuresh Pem and Namrata Gaikwad Chemistry) या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मयूरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रणव रावराणे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृतिका गायकवाड, देविका दफ्तरदार यांच्या चित्रपटांमध्ये भूमिका आहेत. गुरु ठाकूर (Guru Thakur) आणि विष्णु थोरे (Vishnu Thore) यांनी गीत लेखन, अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन, फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. वैशाली सामंत (Vaishali Samant), अमितराज, मधुरा कुंभार, हृषिकेश शेलार (Hrishikesh Shelar) यांनी गाणी गायली आहेत. तर पार्श्व संगीत आणि संगीत मयूरेश केळकर यांचे आहे. विनोद पाटील यांचे छायालेखन आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details