महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Urvashi Rautela Clarification: उर्वशी रौतेलाने व्हिडिओमध्ये आय लव्ह यू कुणाला म्हटले? तिने दिले स्पष्टीकरण - व्हायरल व्हिडिओ

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) बुधवारी पहाटे सोशल मीडियावर तिच्या व्हायरल (Viral Video) 'आय लव्ह यू' (I Love You) व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले.

उर्वशी रौतेला स्पष्टीकरण
Urvashi Rautela Clarification

By

Published : Oct 19, 2022, 12:50 PM IST

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे सतत चर्चेत राहते. बुधवारी पहाटे सोशल मीडियावर तिने आय लव्ह यू म्हटलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिने स्पष्टीकरण (Urvashi Rautela Clarification) दिले आहे. विशेष म्हणजे तिच्या स्पष्टीकरणावरी चाहते व्यक्त होऊ लागले आहेत.

उर्वशीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तिने लिहिले की, आजकाल व्हायरल (Viral Video) होत असलेल्या माझ्या 'आय लव्ह यू' (I Love You) व्हिडिओबद्दल पुन्हा एकदा स्पष्टीकरण देऊ इच्छिते की, ते केवळ अभिनयाच्या दृष्टीकोनातून होते. कोणताही व्हिडिओ कॉल नव्हता.

भूतकाळातही केला ट्रोलिंगचा सामना: उर्वशीची एक छोटी क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती 'आप बोलो आय लव्ह यू...नही पहले आप बोलो आय लव्ह यू...एक बार बोलदो...बस एक बार बोलो' म्हणताना दिसत आहे. ज्यामुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. या अभिनेत्रीला भूतकाळात अनेक ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

यापूर्वी ही झाली होती चर्चा:क्रिकेटर ऋषभ पंतला (Cricketer Rishabh Pant) फॉलो केल्याबद्दल नेटिझन्सनी उर्वशीला ट्रोल केले. यावर्षी ऑगस्टमध्ये उर्वशीने एका एंटरटेनमेंट पोर्टलला मुलाखत दिली होती, ज्याची क्लिप आता व्हायरल झाली आहे. मुलाखतीत, उर्वशी म्हणाली की ऋषभ पंतने तिला भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये जवळपास 10 तास तिची वाट पाहिली. तिला झोपली असल्यामुळे आणि त्याला इतका वेळ वाट बघायला लावल्याबद्दल तिला वाईट वाटले.

ऋषभ पंतने केली होती पोस्ट:ही क्लिप व्हायरल होताच चाहत्यांनी ऋषभ पंतला पुन्हा तिच्यासोबत जोडण्यास सुरुवात केली. नेटिझन्सनी असे लिहायला सुरुवात केली की, मुलाखतीत ज्या आरपीबद्दल उर्वशी बोलत आहे तो दुसरा कोणी नसून भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत आहे. त्यानंतर ऋषभ पंतने एक इंस्टाग्राम स्टोरी टाकली होती. त्याने काही तासांनंतर डिलीट केली. त्याने लिहिले की, हे मजेदार आहे की लोक मुलाखतींमध्ये फक्त काही लोकप्रियतेसाठी आणि हेडलाइन्ससाठी कसे खोटे बोलतात. काही लोक प्रसिद्धी आणि नावासाठी तहानलेले आहेत हे वाईट आहे. देव त्यांना आशीर्वाद देवो.

ABOUT THE AUTHOR

...view details