कान्स ( फ्रान्स ) - ७५ व्या कान्स फिल्म महोत्सवाच्या रेड कार्पेटवर एक अजब दृष्य पाहायला मिळाले. एक अर्धनग्न महिला रेड कार्पेटवर अवतरली आणि तिने युक्रेनमध्ये होत असलेल्या महिलांवरील लैंगिक अत्याचाराला विरोध करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. अखेर त्या आंदोलनकर्त्या अर्धनग्न महिलेला कान्सच्या रेड कार्पेटवरून हटवावे लागले.
हॉलिवूड रिपोर्टरने वृत्त दिले की, रेड कार्पेटवर एक महिला आली व तिने फोटोग्राफर्सचे लक्ष आपल्याकडे वेधत गुडघ्यावर बसून आपले कपडे उतरवायला सुरूवात केली. लगेचच सुरक्षा रक्षक तिच्याकडे धावत आले आणि कोटने तिला झाकताना दिसले.