महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Tiku Weds Sheru Twitter review: नेटिझन्सनी दिला चित्रपटाच्या बाजून कौल, नवाझ आणि अवनीत कौरची होतेय प्रशंसा

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ओटीटी रिलीज टिकू वेड्स शेरूचे ट्विटर युजर्सनी स्वागत केले आहे. चित्रपटाची कथा, अभिनय, विनोद प्रेक्षकांना आवडल्याचे दिसत आहे.

नवाझ आणि अवनीत कौरची होतेय प्रशंसा
नवाझ आणि अवनीत कौरची होतेय प्रशंसा

By

Published : Jun 23, 2023, 7:40 PM IST

मुंबई- कंगना रणौत निर्मित टिकू वेड्स शेरू चित्रपट शुक्रवारी अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला. ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासात यावर सोशल मीडियातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तुम्ही जर हा चित्रपट ऑनलाई पाहण्याच्या तयारीत असाल तर प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रतिक्रियांवर एकदा जरुर नजर टाका.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला ट्विटरवर आवश्यक इतके प्रेम मिळाले आहे. नेटिझन्सनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे, विशेष उल्लेख करून पदार्पण करणाऱ्या अवनीत कौरचे कौतुक होत आहे. एका युजरने प्रतिक्रिया देताना लिहिले, 'एक सुंदर गोड आणि निरागस रोमँटिक प्रेमकथा!! कॉमेडी, रोमान्स, ड्रामा यांनी परीपूर्ण असलेले मनोरंजन! टिकु वेड्स शेरू हा चित्रपट उत्कृष्ट अभिनय, प्रेमळ पात्रे, उच्च दर्जाची गुणवत्ता असलेला चित्रपट आहे'.

दुसर्‍या एका ट्विटर युजरने लिहिलंय, 'मी नुकताच अमेझॉन प्राइमवर टिकू वेड्स शेरु हा चित्रपट पाहिला. कॉमेडी, रोमान्स, ड्रामाने परिपूर्ण असा हा चित्रपट आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री छान होती. मला हा चित्रपट आवडला! चित्रपट एक परिपूर्ण रत्न आहे! कंगना रनौत जी कधीच आपल्याला निराश करत नाही'.

आणखी एकाने लिहिले, 'टिकू वेड्स शेरुपाहून मी अक्षरशः अवाक झालोय. अवनीत कौरच्या अभिनयाने मी प्रभावीत झालो आहे. नवाजुद्दीनची तर किती तारीफ करायची तितकी ती थोडीच आहे. इतकी छान कथा दाखवल्याबद्दल कंगनाच्या टीमचे आभार'. अशाच प्रकारे कंगनाच्या टीमला शुभेच्छा देणारे आणि चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करणारे आणि नवाजुद्दीन आणि अवनीतच्या अभिनयाची प्रशंसा करणारे अनेक ट्विट पाहायला मिळत आहे.

कंगना रणौतने या चित्रपटाची निर्मिती केली असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन साई कबीर श्रीवास्तव यांनी केले आहे. या असामान्य रोम-कॉममध्ये अभिनेत्री अवनीत कौर नवाजुद्दीनच्या प्रेमाच्या भूमिकेत आहे. कथा टिकू (अवनीत) आणि शेरू (नवाझुद्दीन) यांच्या धाडसाची आहे. फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचे नाव व्हावे यासाठी संघर्ष करणारा कलाकार आणि एक महत्त्वाकांक्षी अभिनेत्याच्या जीवनातील चढ-उतारांचे वास्तववादी चित्रण यात आहे.

हेही वाचा -

१.Ranbir And Alia Date Night: रणबीर कपूर आणि आलिया भट्टची दुबईमध्ये डेट नाईट

२.Dhoomam: Box Office Day 1: फहाद फासिलचा नवीनतम अ‍ॅक्शन थ्रिलर 'धूमम' चित्रपट आज मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

३.Rashmika Mandanna : मॅनेजरसोबतच्या भांडणावर रश्मिका मंदान्नाने केला खुलासा...

ABOUT THE AUTHOR

...view details