महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित अभिनित ‘रानबाजार’च्या टिझरला १० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज! - teaser of Ranbazar 1 million views

वेबविश्वाला हादरवून टाकणारी 'रानबाजार' ही वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वरील नवीनत कलाकृती आहे. यात अत्यंत प्रक्षोभक विषयाला हाताळण्यात आले असून त्यातील आशय स्तंभित करणारा ठरू शकतो. या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांनी या टिझरच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका दिवसात या टिझरला १० लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर या टिझरवर प्रेक्षकांच्या उस्फुर्त प्रतिक्रिया मिळत आहेत.

‘रानबाजार’च्या टिझरला १० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज!
‘रानबाजार’च्या टिझरला १० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज!

By

Published : May 17, 2022, 5:22 PM IST

मुंबई - अनेक वेबसिरीजना आशयाबाबतीत मागे टाकणारी 'रानबाजार' लवकरच 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेबविश्वाला हादरवून टाकणारी 'रानबाजार' ही वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वरील नवीनत कलाकृती आहे. यात अत्यंत प्रक्षोभक विषयाला हाताळण्यात आले असून त्यातील आशय स्तंभित करणारा ठरू शकतो.

‘रानबाजार’च्या टिझरला १० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

१८ मे रोजी या वेबसिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचा टिझर सोशल मीडियावर झळकत आहे. या दोन्ही टिझरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांनी या टिझरच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका दिवसात या टिझरला १० लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर या टिझरवर प्रेक्षकांच्या उस्फुर्त प्रतिक्रिया मिळत आहेत.

‘रानबाजार’च्या टिझरला १० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज
‘रानबाजार’च्या टिझरला १० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली असून ‘रानबाजार’ येत्या २० मे पासून 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा -अभिनेता नसतो तर आयएएस किंवा आयपीएस असतो - मिलींद शिंदे

ABOUT THE AUTHOR

...view details