महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

‘किचन कल्लाकार’ च्या किचनमध्ये बालकलाकार करणार कल्ला! - Child artist in Kitchen Kallakar

‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात प्रेक्षकांचे आवडते बालकलाकार हजेरी लावणार आहेत. आणि नुसतीच हजेरी नव्हे तर ते ‘किचन कल्लाकार’ च्या किचनमध्ये कल्ला करीत स्वयंपाकही करणार आहेत.

किचन कल्लाकार
किचन कल्लाकार

By

Published : May 11, 2022, 4:45 PM IST

शक्यतो पाकककलेच्या कार्यक्रमात मोठे लोक येत असतात. कलाकारही येतात पण तेही मोठेच असतात. परंतु ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात प्रेक्षकांचे आवडते बालकलाकार हजेरी लावणार आहेत. आणि नुसतीच हजेरी नव्हे तर ते ‘किचन कल्लाकार’ च्या किचनमध्ये कल्ला करीत स्वयंपाकही करणार आहेत. झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय.

किचन कल्लाकारमध्ये बाल कलाकार

अभिजित गुरु आणि समिधा गुरु यांची कन्या दुर्वा गुरु, नाळ चित्रपटातील चैत्या म्हणजेच श्रीनिवास पोकळे आणि गायक मंगेश बोरगावकर यांची चिमुकली मीरा बोरगावकर किचन कल्लाकारच्या आगामी भागात सहभागी होणार आहेत. ही बच्चेकंपनी किचनमध्ये तर कल्ला करणारच आहे पण त्यांची धमाल मजा मस्ती प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करेल. चिमुकली मीरा तिच्या बाबांना जर ते शाळेत जात असतील तर त्यांना आई म्हणून सूचना देताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इतकंच नव्हे तर मुलं आणि त्यांचे वडील यांच्यासोबत कार्यक्रमात मजेदार गेम्स देखील पाहायला मिळतील.

अभिजित गुरु आणि समिधा गुरु यांची कन्या दुर्वा गुरु

प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना या कार्यक्रमात किचनमध्ये धावपळ करताना पाहतात पण या आठवड्यात त्यांचे लाडके बालकलाकार ‘महाराजांना’ त्याच्या इवल्याश्या हाताने पदार्थ करून देणार आहेत. तेव्हा या किचन कल्लाकारच्या मंचावर कोण सगळ्यात जास्त छान पदार्थ बनवून महाराजांना खूष करणार आणि बच्चेकंपनी आपल्या निरागसतेने प्रेक्षकांचं मन कसं जिंकणार हे बघणे त्यांच्यासाठी उत्सुकतेचे असणार हे नक्की.

नाळ चित्रपटातील चैत्या म्हणजेच श्रीनिवास पोकळे

‘किचन कल्लाकार’ हा कार्यक्रम बुधवारी आणि गुरुवारी झी मराठीवर प्रसारित होतो.

हेही वाचा -''बॉलिवूड मला परवडत नाही'', महेश बाबूच्या या विधानामुळे चर्चेला उधाण

ABOUT THE AUTHOR

...view details