महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Schin Shroff wedding : सचिन श्रॉफ दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, वधूचे नाव गुलदस्त्यात - सचिन श्रॉफ २५ फेब्रुवारीला दुसऱ्यांदा बोहल्यावर

अभिनेता सचिन श्रॉफ २५ फेब्रुवारीला दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. यापूर्वी त्याने जुही परमारसोबत लग्न केले होते. दुसरे लग्न तो कोणाशी करणार आहे तिचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

Schin Shroff wedding
Schin Shroff wedding

By

Published : Feb 23, 2023, 1:38 PM IST

मुंबई- तारक मेहता का उल्टा चष्मा या कॉमेडी सिरीजमधील अभिनेता सचिन श्रॉफ २५ फेब्रुवारीला दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. यापूर्वी त्याने जुही परमारसोबत लग्न केले होते. दोघांच्या संसारत समायरा ही मुलगीही आहे. परंतु सचिन आणि जुही यांच्यात बिनसले असून त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुलगी समायरा ही अस्वस्थ झाली आहे. दरम्यान सचिन श्रॉफने दुसरे लग्न करण्याची तयारी सुरू केली आहे.

नवीन पत्नीचे नाव अद्याप गुलदस्त्यात- सचिन श्रॉफची होणारी पत्नी ही त्याच्या बहिणीची मैत्रीण आहे. दोन्ही कुटुंबीय एकमेकांना खूप काळापासून ओळखत आहेत. सचिन आणि जुही परमार यांच्या बिनसल्यानंतर श्रॉफ कुटुंबीयांनी लग्नाचा प्रस्ताव सचिनसमोर ठेवल्याचे समजते. यावर सचिनने खूप विचार केला आणि लग्नास होतार दिला आहे. सचिनची होणारी पत्नी ही इंटिरियर डिझायनर आहे. सचिन श्रॉफ आणि जुही परमार हे एका टीव्ही शोच्या सेटवर भेटले आणि काही दिवसानंतर डेटिंग करु लागले. कालांकराने दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि 15 फेब्रुवारी 2009 रोजी जयपूरमध्ये त्यांनी लग्न केले. दोघांचा संसार छान चालू असतानाच 27 जानेवारी 2013 रोजी त्यांच्या संसारात मुलीचे आगमन झाले.

विभक्त होण्याचा निर्णय - मुलीच्या आगमनाचा आनंद दीर्घकाळ टिकला नाही. सचिन आणि जुहीमध्ये किरकोळ कारणावरुन खटके उडू लागले. २०१७ नंतर त्यांच्यातील वाद वाढत गेला आणि अखेर जुही परमारनेच जानेवारी 2018 मध्ये सचिनसोबत घटस्फोटाची घोषणा करून सर्व चर्चांना विराम दिला. दोघामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले ज्यामुळे त्याचे रुपांतर कडू घटस्फोटात झाले. सचिन आणि जुहीचा घटस्फोट परस्पर संमतीने, सौहार्दपूर्ण आणि सन्माननीय रीतीने झाला असल्याचे नंतर सचिनने सांगितले होते. आपल्यावरील जुहीचे प्रेम कमी झाले होते किंवा ती प्रेमच करत नव्हती असा दावा घटस्फोटानंतर सचिनने केला होता. जुही परमारला घटस्फोटानंतर सचिनने केलेले आरोप मान्य नव्हते. सार्वजनिकपणे त्याने केलेली वक्तव्ये तिने खोडून काढली होती. मुलगी समायरासाठी फ्लॅट दिल्याचा दावाही तिने खोडला होता. ती म्हणाली होती की त्यावर कर्ज आहे आणि ते आपल्याला परत करावे लागणार आहे.

सचिन आणि जुहीचे आता सौहार्दपूर्ण संबंध - सचिन श्रॉफ आणि जुही परमार यांच्यातील संबंध आता सौहार्दपूर्ण राहिले आहेत आणि सोशल मीडियावर एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देताना दिसतात. सचिनही आपल्या मुलीसोबत खास प्रसंगी फोटो पोस्ट करत असतो. त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी ती अनेकदा त्याला भेटायला येते. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये सचिन श्रॉफने तारक मेहताच्या भूमिकेत पाऊल ठेवले. गेल्या वर्षी काही महिन्यांपूर्वी त्याने शैलेश लोढा यांची जागा घेतली आहे. याआधी तो घूम है किसीके प्यार में मध्ये दिसला होता.

हेही वाचा -Kanak Rele Passed Away : शास्त्रीय नृत्यांगना कनक रेळे यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी लिहिली भावनिक पोस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details