महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sunil Holkar Passed Away : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता सुनील होळकर यांचे निधन - सुनील होळकर यांचे निधन

सुनील होळकर हे गेल्या काही दिवसांपासून लिव्हर सोरायसिस या गंभीर आजाराला झुंज देत होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली. अखेर १३ जानेवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Sunil Holkar
सुनील होळकर

By

Published : Jan 14, 2023, 4:05 PM IST

मुंबई :लोकप्रिय टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता सुनील होळकर यांचे निधन झाले आहे. ते फक्त 40 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, होळकर यांना लिव्हर सिरोसिसचा त्रास होता.

लिव्हर सोरायसिसचा आजार होता : सुनील होळकर हे एक कुशल अभिनेता होते. त्यांनी हिंदी तसेच अनेक मराठी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील होळकर गेल्या काही दिवसांपासून लिव्हर सोरायसिस या गंभीर आजाराला झुंज देत होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली. अखेर १३ जानेवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुनील होळकर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :KL Rahul Athiya Shettys wedding : केएल राहुल आणि अथिया शेट्टी या दिवशी घेणार 7 फेऱ्या, पाहा पाहुण्यांची यादी

12 वर्षांहून अधिक काळ थिएटरमध्येही काम : तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये आपल्या दमदार अभिनयाने सुनीलने प्रेक्षकांना भरपूर हसवले आहे. एवढेच नाही तर 'गोष्ट एका पैठणीची' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे. सुनील होळकर यांनी अभिनेता अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेतही काम केले आहे. अभिनेता आणि कथाकार म्हणून लोकप्रिय असलेल्या सुनीलने 12 वर्षांहून अधिक काळ थिएटरमध्येही काम केले आहे.

अनेक हिंदी मालिकांमध्ये काम : सुनील होळकर यांनी नाटक आणि मालिकांसोबतच अनेक मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. मोरया सिनेमातील त्यांची व्यक्तीरेखा आजही अनेकांच्या लक्षात आहे. तसेच भूताटलेल्या या वेब सीरिजमध्येही त्यांनी काम केलं आहे. हिंदी मालिकाविश्वात ते सहाय्यक भूमिकांसाठी विशेष ओळखले जायचे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सोबतच त्यांनी 'मॅडम सर', 'मि. योगी' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

हेह वाचा :Sanjay Chouhan passes away : पान सिंग तोमर लेखक संजय चौहान यांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details