महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बाईकवर दूध विकणाऱ्या सुनील ग्रोव्हरचा फोटो पाहून चाहत्यांच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया - द कपिल शर्मा शो

गुत्थी फेम अभिनेता सुनील ग्रोव्हरने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तो बाईकवर रस्त्यावरून दुध विकताना दिसत आहे. सुनीलचे चाहते आता या पोस्टवर मजेशीर कमेंट करत आहेत.

सुनील ग्रोव्हरचा फोटो
सुनील ग्रोव्हरचा फोटो

By

Published : Jan 9, 2023, 12:44 PM IST

Updated : Jan 9, 2023, 2:14 PM IST

मुंबई - प्रसिद्ध कॉमेडी शो द कपिल शर्मा शोमध्ये 'गुत्थी', 'रिंकू देवी' आणि 'डॉक्टर मशूर गुलाटी' यासारख्या माईलस्टोन कॉमिक भूमिका साकारणारा अभिनेता सुनील ग्रोव्हरने त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. खरंतर सुनिलने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो घरोघरी दूध विकताना दिसत आहे. सुनीलचे चाहते आता या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. इतकंच नाही तर चाहतेही सुनिलच्या या धाडसाचं कौतुक करत आहेत.

सुनील ग्रोव्हरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो बाईकवर दूध विकताना दिसत आहे. डोक्यावर जॅकेट आणि लोकरीची टोपी घालून बाईकवर बसलेला सुनील ग्रोव्हर कडाक्याच्या थंडीत दूध विकतोय. दुचाकीच्या दोन्ही बाजूला दुधाचे कॅनही लटकले आहेत. हा फोटो शेअर करत सुनीलने 'दूध मचाले' असे लिहिले आहे. आता या फोटोवर सुनिल ग्रोव्हरचे चाहते तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

येथे वाचा चाहत्यांच्या मजेदार कमेंट्स - सुनील ग्रोव्हरच्या या देसी पोस्टवर चाहते त्याचे कौतुक तर करत आहेतच पण मजेशीर कमेंट्सही करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे, 'अर्धा लिटर पॅक करा भाऊ'. दुसरा चाहता लिहातोय, 'साहेब, कोणतेही काम छोटे नसते, तुम्ही विका, आम्हीही खरेदी करू'.

त्याचवेळी आणखी चाहता लिहितो की, 'भाऊ, तुमचं झालं असेल तर मला बाईक द्या, मला अजूनही पुढे दूध विकायचे आहे'. दुसर्‍याने कपिल शर्मा शोच्या शैलीत लिहिले, 'DGDW डॉक्टर गुलाटी दूध वाले', असे लिहिलंय.

सुनील ग्रोव्हरचा वर्कफ्रंट - सुनील ग्रोव्हर 90 च्या दशकापासून अभिनय जगतात सक्रिय आहे. 1998 मध्ये अजय देवगन आणि काजोल स्टारर 'प्यार तो होना ही था' या चित्रपटात तो दिसला होता. यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका करत आहे.

तो शेवटचा 'गुडबाय' (2022) चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात तो अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत दिसला होता. त्याच वेळी, वादांमुळे, त्याने खूप दिवसांपूर्वी लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' सोडला आहे. पण प्रेक्षक अजूनही त्याच्या गुत्थी, रिंकू देवी आणि डॉ. मशूर गुलाटी या कॉमिक पात्रांना मिस करतात.


Last Updated : Jan 9, 2023, 2:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details