महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Made in Heaven Season 2 : भव्य आणि गुंतागुंतीच्या लग्नांसह वेडिंग प्लॅनर्स पुन्हा परतले, 'मेड इन हेवन २' चा ट्रेलर रिलीज - मेड इन हेवनच्या दुसऱ्या सिझनची उत्कंठा

'मेड इन हेवन २' मालिकेचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. १० ऑगस्टपासून अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारित होणार असलेल्या या मालिकेत भरपूर नाट्य असलेल्या कथा दिसणार आहेत.

Made in Heaven Season 2
'मेड इन हेवन २' चा ट्रेलर रिलीज

By

Published : Aug 1, 2023, 3:33 PM IST

मुंबई - मेड इन हेवन सिझन २' या नाट्यमय वेब सिरीजच्या निर्मात्यांनी अखेर बहुप्रतीक्षित ट्रेलर लॉन्च केला आहे. गतीमान दृष्ये, खुर्चीला खिळवून ठेवणारे कथानक, सर्व प्रकारच्या इमोशन्स आणि विलक्षण नाट्य असलेला हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल याची पूर्ण काळजी झोया अख्तर आणि रीमा कागतीसह निर्मात्यांनी घेतल्याचे दिसते. प्राईम व्हिडिओवर १० ऑगस्ट पासून प्रसारित होणार असलेल्या मेड इन हेवन वेब सिरीजच्या सीक्वेलचे स्वागत करण्यासाठी चाहते आतुर आहेत.

'या सिझनमध्ये भव्य लग्नसोहळ्यासह तुमचे आवडते वेडिंग प्लॅनर्स परत आले आहेत', असे कॅप्शन देत झोया अख्तरने आपल्या इन्स्टाग्रामवर ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर लॉन्च होताच फिल्म इंडस्ट्रीतील सहकलाकार, हितचिंतकांसह चाहत्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. श्वेता बच्चन यांनी तातडीने प्रतिक्रिया देत, ट्रेलर अप्रतिम दिसत असल्याचे झोयाला कळवले आहे. ही मालिका पाहण्यासाठी खूप उतावीळ झालो असल्याचे निर्माता करण जोहरने झोयासाठी लिहिले आहे. दिया मिर्झा, खुशबू यांनीही आपल्या प्रतिक्रिया ट्रेलरवर दिल्या आहेत.

'मेड इन हेवन' ही गाजलेली मालिका २०१९ मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाली आणि यातील उच्चभ्रू लोकांच्या विवाहातील रंजक गोष्टी प्रेक्षकांना आवडू लागल्या. कोरोना महामारीच्या काळात या मालिकेला सर्वाधिक प्रेक्षक वर्ग लागला आणि मालिकेने लोकप्रियतेचा कळस गाठला. यानंतर याचा सीक्वेल करण्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती. त्याची खूप काळ प्रतीक्ष सुरू होती. अखेर यांच्या प्रसारणाची वेळ जवळ आली असून ट्रेलरमुळे मेड इन हेवनच्या दुसऱ्या सिझनची उत्कंठा वाढली आहे.

'मेड इन हेवनचा दुसऱ्या सिझनचे मालिकेचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव, नरज घायवान, नित्य मेहरा, रीमा कागती आणि झोया अख्तर यांनी केले आहे. या मालिकेची निर्मिती रितेश सिद्धवानी, फरहान अख्तरने याची झोया अख्तर आणि रीमा कागती यांनी केली आहे. 'मेड इन हेवन'च्या दुसऱ्या नव्या सिझनमध्ये शोभिता धुलिपाला, कल्की कोयचलीन, जीम सर्भ, मोना सिंग, शशांक अरोरा, शिवानी रघुवंशी आणि विजय राज यांच्या मुख्य भूमिका असतील. या मालिकेत अनेक रंजक विवाहाच्या घडामोडी दाकवल्या जाणार आहेत. अनेक रहस्ये, गुंतागुतींची नाती, वेगवेगळ्या सामाजिक जाणीवा असलेल्या लोकांच्या लग्नाच्या कथा पाहायला मिळतील.

ABOUT THE AUTHOR

...view details