महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Smita Tambe ride Bullock Cart : ‘लगन’ मधील व्यक्तिरेखा साकारण्यासाठी स्मिता तांबेने स्वत: चालवली बैलगाडी - Lagan Marathi movie

नवनवीन भूमिकांसाठी सतत आग्रही असणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री स्मिता तांबे. ती चित्रपट, मालिका, वेबसिरीज या माध्यमांतून वेगवेगळ्या भूमिका करत असते. ‘लगन’ या चित्रपटातील राधा ही व्यक्तिरेखा स्मिता साकारत आहे.

smita tambe
Smita Tambe

By

Published : Apr 19, 2022, 7:37 PM IST

मुंबई : प्रेमात पडणं जेवढं आनंददायी असतं तितकंच समर्थपणे प्रेम निभावणं अवघड असतं, प्रेमामुळंच नाती जोडली आणि तोडलीही जातात. अशीच एक अडचणींवर मात करत प्रेमाची साथ निभावणार्‍या अनोख्या प्रेमाची गोष्ट ‘लगन’ या चित्रपटातून दर्शविण्यात आली आहे.

स्मिता तांबेने स्वत: चालवली बैलगाडी
‘लगन’ चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केलं आहे. चित्रपटाचे छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे असून अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. पार्श्वसंगीत पी.शंकरम तर साऊंड डिझायन विकास खंदारे यांचे आहे. आपल्या अभिनयाच्या छटा दाखवणारी गुणी अभिनेत्री स्मिता तांबे आगामी ‘लगन’ या मराठी चित्रपटात आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे.

उसतोडणी कामगाराची कथा
नवनवीन भूमिकांसाठी सतत आग्रही असणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री स्मिता तांबे. ती चित्रपट, मालिका, वेबसिरीज या माध्यमांतून वेगवेगळ्या भूमिका करत असते. ‘लगन’ या चित्रपटातील राधा ही व्यक्तिरेखा स्मिता साकारत आहे. खेडयात राहणारी ऊसतोड़णी कामगाराची भूमिका तिने यात साकारली आहे. करारी, कणखर तरीही सोज्वळ अशा छटा या व्यक्तिरेखेला आहेत. स्मिताचा खेडवळ लूक यामध्ये दिसणार आहे. या व्यक्तिरेखेसाठी स्मिताने स्वत: बैलगाडी चालवली आहे. ऊसाच्या भल्यामोठया मोळया डोक्यावर घेत उन्हातान्हात शूटिंग केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या गावांतून चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा -T-Series Bhushan Kumar Rape Case : टी-सीरीजचे एमडी भूषण कुमार बलात्कार प्रकरण; कोर्टाने पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट फेटाळला

ABOUT THE AUTHOR

...view details