इंदूर (मध्यप्रदेश): Vaishali Takkar Suicide: शहरातील तेजाजी नगर पोलीस स्टेशन परिसरात राहणारी टीव्ही मालिका अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचबरोबर अभिनेत्रीने एक सुसाईड नोटही Vaishali Takkar Suicide Note टाकली असून, त्यात तिने प्रेमप्रकरणामुळे असे पाऊल उचलल्याचे कारण सांगितले आहे. सध्या पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
वैशाली फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळली : तिचा लहान भाऊ आणि वडीलही वैशाली ठक्करच्या घरात राहत होते. घटनेच्या वेळी ती तिच्या खोलीत झोपली होती आणि बराच वेळ उठून न आल्याने वडिलांनी तिचे दार ठोठावले. जिथे दार न उघडल्याने खिडकीतून पाहिल्यावर ती फासावर लटकलेली दिसली. यानंतर वडिलांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृताची सुसाईड नोट आणि मोबाईल फोन ताब्यात घेऊन तपास सुरू केला.