मुंबई -तारक मेहता का उलटा चष्माच्या गोकुळधाम सोसायटीमधील एकमेव सेक्रेटरी, ज्याला जेठालालचे वडील चंपकलाल गडा, ‘भिंडी मास्तर’ ( Bhindi Master ) म्हणून बोलावतात, म्हणजे आत्माराम तुकाराम भिडे याच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता मंदार चांदवडकर प्रेक्षकांचे प्रेम मिळावीत आलाय. पण या कॉमेडी सीरियलमध्ये काम करत असताना त्याला आज आयुष्य कॉमेडी करतेय की काय असे भासले. मनोरंजनसृष्टीत अनेक सेलिब्रिटीजच्या मृत्यूच्या अफवा पसरत असतात. आज मंदार चांदवडकर ( Actor Mandar Chandwadkar ) यांच्या मृत्यूची खबर पसरली आणि टीव्ही विश्वात आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अवघ्या ४५ व्या वर्षी निधन म्हणजे त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघातच. परंतु काही वेळाने मंदार चांदवडकर ने स्वतः त्या वृत्ताचे खंडन केले. त्याने समाज माध्यमावर लाईव्ह येत मी जिवंत असल्याचा प्रुफच दिला जणू.
हेही वाचा - Cannes 2022: दीपिका पदुकोणला फॅशनपेक्षा भारतीय चित्रपटांवर अधिक चर्चा व्हावी अशी अपेक्षा
त्याने समाज माध्यमावर प्रेक्षकांची संवाद साधत म्हणाला, “नमस्ते! कसे आहेत तुम्ही सगळे? तुमच्या सर्वांचे कामकाज सुरळीत सुरु असेल ही आशा. मीसुद्धा काम करीत आहे. पण अचानक माझ्या मृत्यूची अफवा कोणीतरी पसरवली आणि खूप जणांच्या काळजीपोटी सोशल मीडियावर मी ‘लाईव्ह’ येण्याचा निर्णय घेतला. समाज माध्यमांवर अफवा आगीच्या वेगाने पसरतात. मला सर्वांना खात्री द्यायची होती की मी शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि मजा करतोय. ज्याने कोणी ही अफवा पसरवली आहे त्याला माझी मनापासून विनंती आहे की कृपया हे थांबव. देव त्याला सद्बुद्धी देवो. माझ्यासकट तारक मेहता का उल्टा चष्माचे कलाकार पूर्णपणे निरोगी आणि आनंदी आहेत. त्यांची भविष्यात बरीच वर्षे खूप काम करण्याची योजना आहे तसेच प्रेक्षकांना मनोरंजित करण्याचीही.”