महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Scam 2003 The Telgi Story Volume 2 : 'स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी'चे उर्वरित भाग होणार प्रसारित, रिलीज तारखेची झाली घोषणा - स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी व्हॉल्युम २

Scam 2003 The Telgi Story Volume 2 : देशभरात खळबळ उडवून दिलेल्या स्टँप पेपर घोटाळा प्रकरणावर आधारित 'स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी' ही वेब सिरीज प्रसारित होत होती. दोनेक महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिरीजची उत्कंठा वाढलेली असताना निर्मात्यांनी स्कॅम २००३ द तेलगी स्टोरीचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित केलाय. 'स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी व्हॉल्युम २' मालिकेचं अंतिम पाच भाग भाग सोनी लिव्हवर ३ नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहेत.

Scam 2003 The Telgi Story Volume 2
स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी चे उर्वरित भाग होणार प्रसारित

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 4:35 PM IST

मुंबई - Scam 2003 The Telgi Story Volume 2 : हंसल मेहता यांच्या 'स्कॅम १९९२' द हर्षद मेहता स्टोरीनं प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळविल्यानंतर त्यांनी 'स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी' ही वेब सिरीज काढली. त्याचे ५ भाग त्यांनी दोनेक महिन्यांपूर्वी प्रदर्शित केले आणि सिरीजची उत्कंठा वाढलेली असताना उर्वरित ५ भाग नंतर प्रदर्शित करू असं सांगून टाकलं. ते उर्वरित भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून स्कॅम २००३ द तेलगी स्टोरीचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित नुकताच प्रकाशित करण्यात आलाय. ट्रेलर पाहिल्यावर या सिरीजची उत्कंठा अधिकच वाढलीय. 'स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी व्हॉल्युम २' अंतिम भाग सोनी लिव्हवर ३ नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहेत.



अब्दुल करीम तेलगी याने केलेला स्टॅम्प पेपर घोटाळा आणि त्याला मिळालेली राजकारण्यांची साथ यामुळे हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं. कर्नाटकातील खानापूरमधील एक सामान्य फळविक्रेता आणि त्यानं रचलेलं कोट्यवधी रुपयांचे षडयंत्र यावर मालिका आधारित असून त्यानं शासकीय यंत्रणा कशी खिशात घालून ठेवली होती यावर ही सिरीज प्रकाश पाडते. भारतातील सर्वात कल्पक घोटाळ्यांपैकी एक असलेल्या या कथेत त्यानं आपले जाळं तब्बल १८ राज्यांमध्ये पसरवलं होतं. हा घोटाळा जेव्हा बाहेर आला तेव्हा संपूर्ण देश हादरून गेला होता आणि अनेक शासकीय अधिकारी, राजकारणी आणि मंत्री यांचं धाबं दणाणलं होतं.

'स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी' चे उर्वरित भाग

तेलगीच्या अटकेनंतर तो कोणाचं नाव घेतोय याबाबत मोठी उत्कंठा होती. ट्रेलरमध्येही त्याला जेव्हा या घोटाळ्यात कोण राजकारणी सामील आहे, असं विचारलं जातं तेव्हा तो अनेकजण असल्याचं सांगतो. आता या मालिकेच्या उत्तरार्धात तेलगी कोणाचं नाव घेतो हे पाहणं उत्कंठा वाढवणारं आहे.

'स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी' मध्ये भरत जाधव



या मालिकेत गगन देव रियार, सना अमीन शेख, भावना बलसावर, भरत जाधव, जे.डी. चक्रवर्ती, भरत दाभोळकर, तलत अजीज, निखिल रत्नपारखी, विवेक मिश्रा, हिता चंद्रशेखर, अजय जाधव, दिनेश लाल यादव आणि शशांक केतकर यांच्या भूमिका आहेत. या सिरीजचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यानं केलं असून शो रनर आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता.

ABOUT THE AUTHOR

...view details