महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आर. माधवनचा 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' चित्रपट OTT रिलीजसाठी सज्ज - ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर रॉकेटरी द नंबी इफेक्ट

अभिनेता आर. माधवन दिग्दर्शित 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट'च्या थिएटरमधील यशानंतर आता हा चित्रपट ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता 26 जुलै रोजी ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

आर. माधवनचा 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट'
आर. माधवनचा 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट'

By

Published : Jul 21, 2022, 1:28 PM IST

मुंबई - अभिनेता आर. माधवन दिग्दर्शित 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' हा चित्रपट १ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांसह समीक्षकांनी या चित्रपटाचे तोंडभरुन कौतुक केले होते. आता हा चित्रपट ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता 26 जुलै रोजी ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. अपडेट शेअर करताना, माधवनने इंस्टाग्रामवर लिहिले, "स्पेस अॅडव्हेंचर #RocketryOnPrime, 26 जुलै रोजी पहा."

आर माधवन दिग्दर्शित या चित्रपटात माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांची प्रमुख भूमिका आहे. चित्रपटाचे शूटिंग भारत, फ्रान्स, कॅनडा, जॉर्जिया आणि सर्बिया येथे झाले आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि सुरिया यांनी कॅमिओची भूमिका केली होती. सुपरस्टार्सच्या कॅमिओबद्दल बोलताना माधवनने खुलासा केला की त्यांनी एक पैसाही आकारला नाही.

''दोघांनीही ( शाहरुख आणि सुर्य ) या चित्रपटासाठी एक पैचेही मानधन घेतले नाही. त्यांनी त्यांचा कारवां, वेशभूषा आणि असिस्टंट्स यांचेही पैसे आकारले नाहीत. खरतर सुर्याने मुंबईत क्रूसह येऊन शूट केले. यासाठी विमान प्रवास, तामिळ भाषेत डायलॉग भाषांतर करण्यासाठी तो स्वतःचा लेखक घेऊन आला होता, त्याचेही मानधन त्याने स्वतः दिले. या इंडस्ट्रीमध्ये असंख्य चांगली माणसं आहेत. मी बाहेरचा असूनही अनेकांनी मला नेहमीच मदत केली आहे. माझ्या केवळ एका विनंती वरुन अमिताभ बच्चनजी व प्रियंका चोप्रा यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ट्विट केले. मी त्यांच्या या प्रेमाबद्दल, आदराबद्दल ऋणी आहे'', असे आर माधवन म्हणाला. 'रॉकेटरी' जगभरात हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडसह सहा भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा -लग्नाची चर्चा केवळ अफवा असल्याचा अभिनेत्री नित्या मेननचा खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details