मुंबई - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्या विभक्त होण्याचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरने आता शोएब मलिकसोबतच्या संबंधांवर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे, शोएब आणि सानियाच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, आयशा आणि शोएबच्या रोमँटिक फोटोंनी बरेच लक्ष वेधून घेतले होते. या मुद्द्यावरून पाकिस्तानी अभिनेत्रीलाही खूप ट्रोल करण्यात आलं होतं. आयशा ही लॉलीवूड (पाक सिनेमा) मधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे आणि आता तिने यावर आपली भूमिका मांडली आहे.
रोमँटिक फोटोबाबत अभिनेत्री काय म्हणाली? - सानिया आणि शोएब मलिकच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, शोएब-आयेशाचे जे रोमँटिक फोटो व्हायरल झाले होते ते एका ब्रँड प्रमोशनसाठी केलेले फोटोशूट होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयशाने आता यावर आपले मौन सोडले असून, हे फोटोशूट वर्षभरापूर्वी शूट करण्यात आले होते आणि शोएब-सानियाच्या बिघडत चाललेल्या नात्यामध्ये याचा गैरवापर करण्यात आला होता.