महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Netflix sharing in India : भारतात पासवर्ड शेअरिंग करण्यावर नेटफ्लिक्सची बंदी - नेटफ्लिक्स वापरणाऱ्या सदस्यांना

नेटफ्लिक्स वापरणाऱ्या सदस्यांना कंपनीने आपला पासवर्ड घराबाहेरच्या लोकांना शेअर न करण्याचा सल्ला दिलाय. असे करणाऱ्या ग्राहकांशी कंपनी थेट संपर्क साधणार असल्याचे नेटफ्लिक्सने म्हटले आहे.

Netflix stops password sharing in India
पासवर्ड शेअरिंग करण्यावर नेटफ्लिक्सची बंदी

By

Published : Jul 20, 2023, 1:45 PM IST

Updated : Jul 20, 2023, 2:56 PM IST

मुंबई - नेटफ्लिक्स वापरणाऱ्या भारतीय प्रेक्षकांसाठी कंपनीने एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यापुढे नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर करणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे ग्राहक घराबाहेर लोकांना पासवर्ड पाठवतात, अशा लोकांना याबद्दल सूचीत केले जाणार आहे.

कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलंय,' भारतात जे लोक घराबाहेर लोकांना पासवर्ड पाठवत आहेत, अशा सदस्यांना आम्ही इमेल पाठवणार आहोत. नेटफ्लिक्सचे खाते एका परिवाराच्या वापरासाठी आहे. त्या घरात राहणारा प्रत्येक व्यक्ती त्याचा लाभ घेऊ शकतो, मग तो कोणीही असो. घरात, घराबाहेर फिरताना, सुट्टीवर आणि ट्रान्सफर प्रोफाइल तसेच एक्सेस आणि डिवाइस प्रबंधित करण्यासारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकतो.'

पासवर्ड शेअरिंग करण्यावर नेटफ्लिक्सची बंदी

'मे महिन्यामध्ये नेटफ्लिक्सने १०० हून अधिक देशामध्ये पेड शेअरिंगला परवानगी दिली होती. कंपनीच्या आमदनीचा हा ८० टक्के इतका हिस्सा आहे. नेटफ्लिक्सनुसार प्रत्येक प्रदेशातील कमाई आता प्री-लाँचहून जास्त आहे, साइन-अप आधीच रद्द करण्यापेक्षाही जास्त आहेत. कंपनीने असंही म्हटलंय की, या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ५.९ दशलक्ष डॉलर्स दिले गेले. याशिवाय उर्वरीत सर्व देशांमध्ये पेमेंट शेअरिंग करणे सुरू झाले आहे. २०२३ सालाच्या दुसऱ्या तिमाहीत कमाईमध्ये ८.२ बिलीयन डॉलर इतकी वाढ झाली आणि १.८ बिलियन डॉलर्स इतका नफा झाला आहे. यावर्षीच्या दुसऱ्या सहामाहीमध्ये कमाईत वेगाने वाढ होणार आहे. आम्हाला पेमेंट शेअर करण्याचा पूर्ण लाभ होईल आणि आमच्या जाहीरात योजनामध्ये निरंतर वाढ होताना दिसत आहे. आम्ही २०२३ मध्ये ऑपरेटिंग मार्जिन १८ ते २० टक्के करण्याचे लक्ष्य ठेवून आहोत.', असेही सांगण्यात आले.

नेटफ्लिक्सच्या निवेदनात पुढे असंही म्हणलंय की, 'ओटीटी फ्लॉटफॉर्म उदार घेणाऱ्या परिवारांना पूर्ण पेमेंटच्या नेटफ्लिक्स सदस्यतेसोबतच आमची अतिरिक्त सदस्य सुविधेसाठी योग्य रुपांतरणही पाहात आहोत.' नेटफ्लिक्सचे मुख्य वित्तीय अधिकारी स्पेन्स एडम न्यूमॅनने म्हटलंय की, 'यावर्षीची आमची अधिकांश कमाईतील वाढ ही नवीन पेमेंट करणाऱ्या सदस्यांच्या माध्यमातून झाली आहे. आणि हे मुख्यत्वे आमच्या पेमेंट शेअरिंग रोलआउटद्वारे चालत असते.'

Last Updated : Jul 20, 2023, 2:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details