मुंबई - दिग्दर्शक नीरज पांडे 'बंद में था दम' या आगामी वेब सीरिजमध्ये 2020/21 च्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर क्रिकेटप्रेमींना घेऊन जाण्यासाठी सज्ज झाला आहे. रिलीज होण्यापूर्वी, वूटने नीरज पांडे दिग्दर्शित चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर मुंबईतील इव्हेंटमध्ये लॉन्च केला. या वेबसिरीजमुळे प्रेक्षकांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या ऐतिहासिक विजयाची झलक पुन्हा पाहायला मिळू शकेल.
नीरज पांडेनेही हा ट्रेलर शेअर करीत त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिले, "जेव्हा सर्व काही त्यांच्या विरोधात होते, तेव्हा ते उभे राहिले आणि त्यांनी जगाला त्यांची खरी जिद्द, ताकद आणि दृढनिश्चय दाखवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान लढतीच्या कथेचा साक्षीदार व्हा. कसोटी इतिहासातील भारताच्या सर्वात मोठ्या विजयामागील कथा. बंदों में था दम - भारताच्या अभिमानाची लढाई."
एक शक्तिशाली स्क्रिप्ट, पडद्यामागील फुटेज, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत आणि हनुमा विहारी यांसारख्या विजेत्या संघातील खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, तसेच मालिका कव्हर करणारे पत्रकार या सर्वांची स्पष्ट कथन यात पाहायला मिळणार आहे. 'बंद में था दम' ही मालिका भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्या घरच्या गाब्बा मैदानात अविस्मरणीय विजय मिळवण्यापूर्वी केलेल्या संघर्षावर प्रकाश टाकते. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 32 वर्षे एकही कसोटी सामना गमावला नव्हता. त्यामुळे या विजयाचे एक वेगळे महत्त्व आहे.