महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Mrs Undercover trailer out now: अंडरकव्हर एजंट म्हणून १० वर्षानंतर परतली राधिका आपटे - मिसेस अंडरकव्हर राधिका आपटे

मिसेस अंडरकव्हर हा राधिका आपटे अभिनीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. गृहिणी म्हणून काम करणाऱ्या एका साहसी एजंटच्या भूमिकेत राधिका झळकली आहे.

मिसेस अंडरकव्हर राधिका आपटे
मिसेस अंडरकव्हर राधिका आपटे

By

Published : Mar 30, 2023, 3:46 PM IST

मुंबई - अभिनेत्री राधिका आपटेचा मिसेस अंडरकव्हर हा चित्रपट 14 एप्रिल रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा प्लॅटफॉर्मने गुरुवारी केली. स्पाय कॉमेडी म्हणून बनवलेला हा चित्रपट, दुर्गा ( राधिका आपटे) या भारतीय गृहिणीची साहसी कथा आहे. अंडर कव्हर म्हणून प्रशिक्षित असलेली दुर्गा १० वर्षानंतर पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये परतते आणि पुन्हा ड्यूटीवर रजू होते. या चित्रपटात राधिका आपटेला झी ५ ओरिजनलमध्ये गृहिणी आणि गुप्तहेर म्हणून कधीही न पाहिलेल्या अवतारात दाखवले जाणार आहे.

राधिका आपटे कथेच्या प्रेमात - प्रसारमाध्यमांशी बोलताना राधिका आपटे म्हणाली की मिसेस अंडरकव्हरच्या कथेच्या प्रेमात ती लगेच पडली कारण ती गृहिणींबद्दलच्या पितृसत्ताक गृहितकांना मिश्कीलपण सामोरी जाते. चित्रपटातील दुर्गा या तिच्या पात्राने तिचे मन जिंकले. यातील दुर्गा ही मनोरंजक, दयाळू, प्रामाणिक, भोळी आणि स्वतःबद्दल अनिश्चित आहे. स्वतःची ताकद शोधण्याचा तिचा प्रवास हा चित्रपटाचा विषय आहे. 'प्रत्येक कुटुंबात एक दुर्गा असते - एक स्त्री जी शांतपणे तिची कर्तव्ये पार पाडते. परंतु तिला कमी लेखले जाते कारण तिला फक्त गृहिणी मानले जाते,' असे राधिका आपटे म्हणाली.

इतर कलाकारही कृतज्ञ- राधिकाने एका निवेदनात म्हटले आहे की हा चित्रपट आपल्या पितृसत्ताक समाजातील मानसिकतेचा सामना करतो आणि विनोदाच्या नावाखाली ते सुंदरपणे सादर केले केले आहे. राधिका आपटेसोबत, राजेश शर्मा मिसेस अंडरकव्हरमध्ये दुर्गाला कामावर घेणार्‍या स्पेशल फोर्सच्या नेत्याच्या भूमिकेत आहेत आणि सुमीत व्यास खलनायकाच्या भूमिकेत आहे. मिसेस अंडरकव्हरमध्ये नकारात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल व्यास यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

एप्रिल महिन्यातील ओटीटीवरील आकर्षण - अनुश्री मेहता या नवोदित अभिनेत्रीने मिसेस अंडरकव्हरचे लेखन आणि दिग्दर्शन केले. आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी आदर्श कलाकार मिळाल्याबद्दल मेहता यांनी कृतज्ञता व्यक्त केली. जादुगर फिल्म्स आणि नाइट स्काय मूव्हीज यांच्या संयुक्त विद्यमाने B4U मोशन पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एप्रिल महिन्यात अनेक चित्रपटांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळणार आहे. यामध्ये ओटीटीवरील हा चित्रपट मनोरंजनाच्या सर्व अटी पूर्ण करणारा वाटत आहे.

हेही वाचा -Parineeti Chopra Enjoying Momos : स्वतःच्या लग्नाचे लाडू खाण्याअगोदर परिणीती चोप्राने दिल्लीत मोमोवर मारला ताव

ABOUT THE AUTHOR

...view details