मुंबई :तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्री मोनिका भदौरिया ही गेल्या काही दिवसांपासून फार चर्चेत आली आहे. तिने तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाबद्दल काही खुलासे केले होते. तिने उघडपणे एका मुलाखतीत सांगितले होते की, सेटवर तिचा निर्मात्याद्वारे छळ होत होता. मुलाखतीत मोनिकाने हे देखील पुढे सांगितले होते की, सेटवर राहणे तिच्यासाठी फार त्रासदायक होते. आता पुन्हा एकदा मोनिकाने याबद्दल भाष्य केले आहे. तिने म्हटले की, 'मला फक्त माझा अनुभव आणि मला काय वाटले ते उघड करायचे होते. मला ते माझ्या चाहत्यांसह आणि माध्यमांसोबत शेअर करायचे होते.
मोनिका भदौरिया केला खुलासा :बदला किंवा प्रतिशोध नाही.' होय मला माझ्याशी होणारे चुकीच्या गोष्टी मला समोर आणायच्या होत्या, पुढे तिने म्हटले, या शोद्वारे माझे पुन्हा एकदा या टिव्ही जगतात पदार्पण झाले होते. मी यापुर्वी मी स्टार प्लसवर 'मैंने इस प्यार को क्या नाम दूं' हा शो केला होता. मी या शोमध्ये नकारात्मक व्यक्तिरेखा साकारत होते. २०१३ मध्ये हा शो बंद झाला. त्यानंतर मला खूप दिवसानंतर तारक मेहता का उल्टा चष्माची ऑफर आली. मी या शोमध्ये बावरीची भूमिका साकारली आणि या शो ने माझे नक्कीच आयुष्य बदलविले. त्यामुळे हा शो माझ्यासाठी फार मोठा आहे. असे तिने सांगितले.