मुंबई - टीव्हीचा सर्वात लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी सीझन 12' लवकरच सुरू होणार आहे. शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संपूर्ण यादीही समोर आली आहे. आता या शोमध्ये आणखी दोन कलाकारांची नावे जोडली गेली आहेत. हे दोन्ही कलाकार टीव्ही बॅकग्राऊंडचे आहेत.
प्रसिद्ध टीव्ही मालिका 'डोली अरमान की' आणि 'कुल्फी कुमार बाजेवाला' फेम अभिनेता मोहित मलिक या शोमध्ये सामील झाला आहे. मोहित मलिक बऱ्याच दिवसांनी टीव्हीवर दिसणार आहे. लग्नाच्या 10 वर्षांनंतर अलीकडेच तो बाप झाला आहे.
मोहित या शोचा एक भाग बनण्यास तयार आहे. त्याने पुढे सांगितले, 'मी वेगवेगळ्या माध्यमात काम केले आहे आणि लोकांनी मला एक गंभीर अभिनेता म्हणून पाहिले आहे, आता मला प्रत्येकाने माझ्या व्यक्तिमत्त्वाची ठळक बाजू पाहावी अशी माझी इच्छा आहे. माझी खरी क्षमता अनलॉक करण्यासाठी आणि 'खतरों के खिलाडी'चा एक भाग होण्यासाठी उत्सुक आहे.