मुंबई - अमेझॉन स्टु़डिओज आणि न्यू यॉर्क टाईम्सची सह-निर्मिती असलेली 'मॉडर्न लव्ह' या काव्यमय मालिकेचे भारतीय रुपांतर पाहायला मिळणार आहे. याचे शीर्षक 'मॉडर्न लव्ह मुंबई' असे असेल. याचा टीझर बुधवारी रिलीज करण्यात आला आहे. केवळ नावे असलेल्या या अॅनिमेशन व्हिडिओमध्ये या मालिकेत काम करीत असलेल्या कलाकारांची यादी पाहायला मिळते. मुंबईतील प्रेमाचा हा काव्यमय आध्याय अनेक पैलू उलगडून दाखवणार आहे.
यात प्रेमाच्या अनेक कथा पाहायला मिळतील आणि त्या सादर करण्यासाठी दिग्गज कलाकारांनी कंबर कसली आहे. विशाल भारद्वाज, हंसल मेहता, शोनाली बोस, ध्रुव सहगल, अलंकृता श्रीवास्तव आणि नुपूर अस्थाना यांची नावे या प्रोजेक्टशी जोडली गेली आहेत.
या मालिकेत ज्या काव्यमय कथा समाविष्ट आहेत त्या पुढील प्रमाणे:
'रात राणी' - शोनाली बोस दिग्दर्शित, फातिमा सना शेख, भूपेंद्र जदावत आणि दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिका
'बाई' - हंसल मेहता दिग्दर्शित, तनुजा, प्रतीक गांधी आणि रणवीर ब्रार यांच्या प्रमुख भूमिका