महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Mirzapur 3 : 'कालीन भैय्या' साकारण्यासाठी पंकज त्रिपाठी पुन्हा उत्सुक - प्राइम व्हिडिओ मालिका मिर्झापूर

अभिनेता पंकज त्रिपाठी लोकप्रिय प्राइम व्हिडिओ मालिका मिर्झापूरच्या तिसर्‍या सीझनचे शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. शोमध्ये निर्दयी माफिया अखंडानंद कालीन त्रिपाठीच्या भूमिकेत दिसणारे त्रिपाठी म्हणाले की, मला या भूमिकेत आनंद मिळतो कारण मला त्यातून शक्ती अनुभवायला मिळते.

पंकज त्रिपाठी
पंकज त्रिपाठी

By

Published : Jun 16, 2022, 3:31 PM IST

मुंबई- अभिनेता पंकज त्रिपाठीने सांगितले की त्याच्या लोकप्रिय प्राइम व्हिडिओ मालिका मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात करण्यासाठी तो उत्सुक आहे. या मालिकेत तो डॉन कालीन भैया या चाहत्यांच्या आवडत्या व्यक्तीरेखेत दिसत असतो. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर द्वारे निर्मित मिर्झापूर ही वेब सिरीज 2018 मध्ये पहिलयांदा प्रसारित झाली आणि ही मालिका सर्वात मोठ्या ब्रेकआउट इंडियन ओरिजिनल्सपैकी एक आहे. दुसरा सीझन 2020 मध्ये भारतातील सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या शोपैकी एक होता.

शोमध्ये निर्दयी माफिया अखंडानंद कालीन त्रिपाठीच्या भूमिकेत दिसणारे त्रिपाठी म्हणाले की, "मला माहित आहे की या मालिकेसाठी चाहत्यांची उत्सुकता प्रचंड आहे. मी उद्या पोशाख ट्रायल करेन आणि एका आठवड्यात आम्ही शूटिंग सुरू करू. मी आता संपूर्ण स्क्रिप्ट देखील ऐकणार आहे, मी पुन्हा कालीन भैय्या बनण्यासाठी खूप उत्सुक आहे.

" हा कार्यक्रम आणि कालीन भैय्याची भूमिका करायला खूप मजा येते. मी खऱ्या आयुष्यात शक्तीहीन माणूस आहे, त्यामुळे मला फक्त कालीन भैय्यामधूनच सत्तेचा अनुभव येतो. सत्तेची भूक, जी प्रत्येकामध्ये असते, ती मिर्झापूरच्या माध्यमातून भागते,” असे अभिनेता पंकज त्रिपाठी म्हणाला.

बहुप्रतिक्षित सीझन तीनच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी पंकज त्रिपाठी निर्माते सृजित मुखर्जी यांच्या शेरदिल: द पिलीभीत सागा या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो गंगाराम ही भूमिका साकारत आहे. गंगाराम आणि कालीन भैय्या या व्यक्तीरेखांची तुलना करताना पंकज त्रिपाठीने सांगितले, "कालीन भैय्या शक्तिशाली आहे, पण गंगाराम शक्तीहीन आहे. ते दोन पूर्णपणे भिन्न लोक आहेत. तुम्हाला गंगाराम लक्षात येणार नाही आणि कालीन भैय्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही."

हेही वाचा -'सूरराई पोत्रू'च्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमारसोबत कॅमिओ साकारणार सुर्या

ABOUT THE AUTHOR

...view details