'मन कस्तुरी रे'चा जबरदस्त ट्रेलर पाहून प्रेक्षकांची चित्रपट पाहाण्याची उत्सुकता वाढली असतानाच आता या चित्रपटातील 'रंग लागला' हे रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात तेजस्वी आणि अभिनयमध्ये नव्याने हळुवार फुलत जाणारे प्रेमाचे नाते दिसत आहे. कॉलेजमधील बहरत जाणारे प्रेम, धमाल यात दिसत आहे. शोर यांनी या गाण्याला संगीत, शब्दबद्ध केले असून आनंदी जोशी आणि अभय जोधपूरकर यांच्या सुमधुर आवाजाची जादू या गाण्यातून अनुभवता येत आहे.
हल्ली व्हायरल झालेल्या ‘नाद’ या रॅाक साँगनंतरचे हे रोमँटिक गाणे तरुण तरुणींना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार आहे. जिथे या प्रेमीयुगुलांना कस्तुरीचा शोध लागेल. दिग्दर्शक संकेत माने म्हणतात, 'तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि अभिनय बेर्डे (Abhinay Berde) या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. 'मन कस्तुरी रे' च्या सगळ्याच गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'रंग लागला' हे गाणंही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.'