मुंबई- Virat Iyer won and lost कौन बनेगा करोडपतीच्या 15 व्या पर्वाचा नवीन एपिसोड उपस्थितांसह करोडो प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून गेला. यामध्ये विराट अय्यर हा 8 वर्षाचा स्पर्धक हॉटसीटवर विराजमान झाला होता. अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या 14 व्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन त्यानं 50 लाख रुपये जिंकले त्यावेळी सर्वांनी श्वास रोखले होते. त्यानंतर त्याला बिग बी यांनी 1 कोटीसाठीचा 15 वा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे अनेक तपशील त्याला माहिती होते. मात्र त्यानं निवडलेला पर्याय चुकीचा ठरला आणि त्याला 3 लाख 20 वर समाधान मानावं लागलं.
विराटला 50 लाखासाठी विचारण्यात आलेला प्रश्न असा होता. यापैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रध्वजात लाल, पांढरा किंवा निळा हे तीन सर्वात सामान्य ध्वज रंग नाहीत? A ) क्युबा B ) कोलंबिया C ) माली D ) जमैका
यासाठी विराटकडे कोणतीही लाईफ लाईन उरली नव्हती. त्यानं विचार केला आणि त्यानं D ) जमैका हा पर्याय निवडला. त्याचं हे उत्तर बरोबर निघालं आणि त्यानं 50 लाख रुपये जिंकले.
त्यानंतर त्याला 1 कोटी रुपयांसाठीचा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न होता. पिरीयॉडिक टेबलमध्ये अनुक्रमे 96 आणि 109 या अणुक्रमांकाच्या दोन घटकांच्या नावात काय वेगळेपण आहे?. यासाठी पर्याय आहेत. A. नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या नावावर, B. महिला शास्त्रज्ञांच्या नावावर, C. भारतीय शास्त्रज्ञांच्या नावावर, D. त्यांची नावे अज्ञात आहेत.
या प्रश्नानंतर विराट अय्यर शास्त्रज्ञांची नावं सांगतो आणि पर्यायांबद्दल खूप विचार करतो. बिग बी त्याला विचार करायला सांगतात आणि खात्री नसल्यास खेळ सोडण्याचा सल्ला देतात. दरम्यान, त्याच्या पालकांनाही या प्रश्नानंतर तणाव आलेला दिसतो. त्यानं खेळ सोडावा असंच त्यांना वाटत असावं. विराटने विचार करताना महिला शास्त्रज्ञांची नावं सांगितली. तो म्हणतो, हे नाव मेरी क्युरी आणि लिस मेटनर यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. आणि नंतर A हा पर्याय निवडतो. बिग बी त्याला सांगतात हे उत्तर चुकलंय आणि याचे योग्य उत्तर B. महिला शास्त्रज्ञांच्या नावावर हे आहे. या चुकीच्या उत्तरामुळे 50 लाख जिंकलेला विराट थेट 3 लाख 20 हजारावर घसरतो. यामुळे छोटा विराट खूप नाराज होतो. मात्र अमिताभ बच्चन त्याची अरिजीत सिंगला भेटण्याची इच्छा पूर्ण करतो आणि त्याचं अरिजीत सिंगसोबत व्हिडिओ कॉलद्वारे बोलणं करुन देतो.