मुंबई- बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आणि सांगितले की त्याच्या लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण'चा ( Koffee with Karan ) पुढचा सीझन येत नाही. ही बातमी ऐकून शोच्या चाहत्यांचे चेहरे फुलले होते, पण दुसऱ्याच दिवशी करणने त्याच्या नवीन पोस्टमध्ये सांगितले की, शोचा पुढचा सीझन येत आहे, पण ओटीटीवर. चाहत्यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आले.
आता या शोशी संबंधित एक मोठे अपडेट समोर येत आहे की, साऊथ स्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना ( Allu Arjun and Rashmika Mandanna ) शोमध्ये प्रवेश करणार आहेत. हे दोन सुपरस्टार चित्रपट निर्माता करण जोहरसमोर (Producer Karan Johar ) त्याच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसणार आहेत. हा एपिसोड चाहत्यांसाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे.