बिग बॉस मराठीचा चौथा सीझनचा (Bigg Boss Marathi Season 4) तिसरा आठवडा आता सुरु झाला आहे. अतिशय वादग्रस्त असलेला हा शो घराघरात तितक्याच आवडीने पाहिला जातो. या पर्वामध्ये विविध क्षेत्रातील १६ कलाकार (16 contestants) सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरात सध्या गटातटाचे राजकारण सुरू आहे. आता किरण माने विकास ची साथ सोडणार आहेत. आज त्यांची मैत्री तुटणार का ? असा सवाल प्रेक्षकांना पडला आहे.
Bigg Boss Marathi Season 4: किरण माने आणि विकासची मैत्री तुटणार का? मराठी बिग बॉसचा सिझन रंजक वळणावर - Vikas Sawant
बिग बॉस मराठीचा चौथा सीझनचा (Bigg Boss Marathi Season 4) तिसरा आठवडा आता सुरु झाला आहे. आता किरण माने विकास ची साथ सोडणार आहेत. आज त्यांची मैत्री तुटणार का ? असा सवाल प्रेक्षकांना पडला आहे.
किरण माने आणि विकासची मैत्री तुटणार का?किरण माने (Kiran Mane) आणि विकास (Vikas Sawant) हे दोघे बिग बॉस मराठीच्या घरात अगदी सुरुवातीपासून चांगले मित्र आहेत. त्यांच्याविरोधात कोणी काहीही बोलले तरीदेखील ते नेहमीच एकत्र असायचे. विकासला किरण माने यांच्याबाबत सांगितले तरी देखील यांची मैत्री तुटली नाही. विकास किरणला मोठा भाऊ मानतो. तसेच विकास किरणला प्रेमाने दाद्या म्हणतो. यंदाच्या चावडीत किरण माने यांना सर्व सदस्यांनी सुनावले. त्याचेच परिणाम म्हणून कि काय आता किरण माने विकासची साथ सोडणार आहेत. आज त्यांची मैत्री तुटणार का ? असा सवाल प्रेक्षकांना पडला आहे.
शोमध्ये सुंबुल आणि किरण माने कमी योगदान :बिग बॉसने (Bigg Boss) घरातील सर्व सदस्यांना सांगितले की, घरातील दोन सदस्यांची नावे सांगा, ज्यांचे योगदान शोमध्ये अत्यंत कमी राहिले आहे. यादरम्यान घरातील जास्त सदस्यांनी सुंबुल (Sumbul) आणि किरण मानेचे (Kiran Mane) नाव घेतले. अभिनेता निखिल राजेशिर्के पडला घरा बाहेर:आता या सीझनमधील पहिले एलिमिनेशन झाले असून अभिनेता निखिल राजेशिर्के (Nikhil Rajeshirke) बाहेर पडला आहे.