मंड्या (कर्नाटक):बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे चाहते संपूर्ण भारतात आहेत. पण मंड्यातील एक कोंबडी विक्रेता तिचा मोठा चाहता आहे. त्याचे दुकान सनी लिओनीच्या फोटोंने भरलेले आहे. आता तो सनी लिओनीच्या चाहत्यांना चिकन खरेदीवर सूट देत आहे. चिकन विक्रेता प्रसाद सांगतो की, जर एखाद्या ग्राहकाने त्याच्या अटींनुसार फॅन असल्याचे सिद्ध केले तर तो वर्षभर 10% सूट देतो.
मंड्यातील नुराडी रोडवरील कर्नाटक बार सर्कलमध्ये दुकानदार प्रसाद यांचे चिकनचे दुकान आहे. त्याने दुकानाच्या गेटवर सनी लिओनीचा फोटो असलेला डिस्काउंट ऑफरचा बोर्ड लावला आहे. पण स्वतःला फॅन म्हणवून त्याच्याकडून चिकन घ्याल असं नाही. त्यासाठी त्यांनी भारीपैकी अटी ठेवल्या आहेत.