मुंबई- बॉलिवूड स्टार सलमान खानच्या जागी चित्रपट निर्माता करण जोहर 'बिग बॉस 16' च्या शुक्रवारच्या विशेष भागाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. वीकेंड का वार एपिसोड दरम्यान, सलमान अनेकदा स्पर्धकांसोबत चर्चा करताना, त्यांना त्यांच्या गेम प्लॅनवर मार्गदर्शन करताना आणि गरज पडेल तेव्हा त्यांना फैलावर घेताना दिसतो.
शनिवारच्या वीकेंड का वारच्या एपिसोडमध्ये सलमान दिसणार आहे. त्याच्या जागी करणने 'बिग बॉस ओटीटी' देखील होस्ट केले आहे आणि तो स्पर्धकांशी कसा व्यवहार करतो आणि शोमध्ये त्यांना कसा झापतो हे पाहणे मनोरंजक असेल.