मुंबई - कोरोना महामारीमुळे लागलेला लॉकडाऊन चित्रपटसृष्टीला बराच भारी पडलेला दिसतोय. त्या कालखंडात थिएटर्स बंद असल्यामुळे, आणि अर्थात लोक घराबाहेर पडू शकत नसल्यामुळे, प्रेक्षकांच्या रुचिता बदल झालेला जाणवतोय. लोकांनी त्या काळात मनोरंजनासाठी ओटीटीचा आधार घेतला. घरबसल्या जागतिक कन्टेन्ट बघायला मिळाल्यामुळे कदाचित त्यांना हिंदी चित्रपटांतून दिसणारे सर्व तकलादू वाटू लागल्याची शक्यता अधिक आहे. परंतु सध्या जवळपास सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडाधड कोसळताहेत त्यामुळे वरील गोष्टीत तथ्य असावे. प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची संख्या आणि वर्षातील फक्त ५२ शुक्रवार यांचा ताळमेळ बस्तान मुश्किल होतेय. त्यातच प्रेक्षकांची अभिरुचीचा झालेला बदल आणि त्यामुळे थिस्टर्स मधील त्यांची रोडावलेली संख्या चित्रपटसृष्टीचे कंबरडे मोडत आहे. निर्माते हवालदिल झाले असताना काही दूरदर्शी निर्मात्यांनी आपला मोर्चा डिजिटल माध्यमाकडे वाळविलेल्या दिसतोय. त्यातील दोन निर्माते म्हणजे करण जोहर आणि गुनीत मोंगा. या दोघांनी हातमिळवणी करीत झी५ प्लॅटफॉर्मसाठी ‘ग्यारह ग्यारह’ या वेब सिरीजची निर्मिती केली आहे. करण जोहर ची धर्माटिक एंटरटेनमेंट आणि गुनीत मोंगा यांची सिख्या एंटरटेनमेंट या नव्या ओरिजिनल वेब सीरीजची निर्मिती करताहेत.
ग्यारह ग्यारह ची कथा बॅनर्जी व संजय शेखर यांनी लिहिलेली असून त्यात रहस्य, विज्ञान आणि गूढता यांचे संमिश्रण दिसेल. या मालिकेत तीन टाइम झोन्स असतील आणि याचे कथानक १९९०, २००१ आणि २०१६ या दशकांत घडताना दिसणार आहे. ‘ग्यारह ग्यारह’ ही ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा आणि अचिन जैन यांची सिख्या एंटरटेनमेंट तसेच सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक करण जोहर व अपूर्व मेहता यांची धर्माटिक एंटरटेनमेंट यांची संयुक्त निर्मिती आहे. या सस्पेन्स थ्रिलर मालिकेत फँटसी ड्रामा देखील अनुभवता येणार आहे. या वेब सिरीज चे दिग्दर्शन उमेश बिश्त करीत असून त्यांची आधीची सिरीज ‘पगलेट’ खूप गाजली होती. या वेबसीरीज मध्ये क्रितिका कामरा, धैर्य कर्वा आणि राघव जुयल प्रमुख भूमिकांत दिसतील.