महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

इसरा झाली इसामरा : गायकांच्या हक्क संघटनेत आता संगीतकारांचाही समावेश

ISRA becomes ISAMRA : देशातील पार्श्वगायकांच्या हक्कांसाठी इसरा म्हणजेच इंडियन सिंगर राईट असोसिएशन ( ISRA ) ही संघटना स्थापन करण्यात आली होती. या संघटनेत आता संगीतकारांचाही समावेश करण्यात येत असून या संघटनेचे नाव 'इसामरा' म्हणजेच इंडियन सिंगर अँड म्यूझिशिएन्स राईट असोसिएशन (ISAMRA) करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अनुप जलोटा यांनी आज मुंबईत एका कार्यक्रमात दिली.

ISRA becomes ISMRA
इसरा झाली इसामरा

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 5:19 PM IST

मुंबई- ISRA becomes ISMRA : इंडियन सिंगर्स राईटअसोसिएशन ( Indian Singers Rights Associations) म्हणजेच इसरा ( ISRA ) ही कंपनी अधिनियम 1956 अंतर्गत मर्यादित नफा करणारी कंपनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली दहा वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आली होती. या कंपनीत सोनू निगम, संजय टंडन, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, पंकज उदास, अनुप जलोटा, कुमार सानू, अभिजीत भट्टाचार्य, कविता कृष्णमूर्ती, शान, हरिहरन, सुनिधी यासारख्या नामवंत गायकांचा समावेश होता. या गायकांची रॉयल्टी गोळा करण्यासाठी आणि त्यांना वितरित करण्यासाठी ही कंपनी कार्यरत आहे.



'इस्मरा'मध्ये आता संगीतकारांचाही समावेश- मात्र इंडियन सिंगर्स राईटअसोसिएशन या संघटनेमध्ये आता दहा वर्षानंतर गायकांसोबतच संगीतकारांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या दहा वर्षात या संघटनेच्या माध्यमातून मोठ मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागलं. माननीय न्यायालयाकडून दोन निकाल घेऊन रॉयल्टी मिळवण्यासाठी गायकांचा हक्क प्रस्थापित केल्यानंतर 2016 मध्ये दिल्ली उच्च न्यायालय आणि ऑक्टोबर 2022 मध्ये इसराने देशातील सर्व संगीत कंपन्यांची ऐतिहासिक करार केला आहे. या करारामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या खटल्याचा शेवट झाला असून गायकांसाठी रॉयल्टी घेण्यात आली. 2023 मध्ये वाणिज्य आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी भारतीय गायकांसाठी 50 कोटींपेक्षा अधिक रॉयल्टीचा ऐतिहासिक घोषणा केली होती. आता रॉयल्टी मिळवून घेण्यासाठी संगीतकारही सरसावले असून त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी ही भारतीय गायक आणि संगीतकारांची असोसिएशन काम करणार आहे. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या गायक आणि संगीतकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संस्थेने परस्पर संवादाच्या आधारे कलाकारांच्या आणि गायकांच्या हक्कापैकी 95 टक्के गायकांच्या हक्काचे संरक्षण केले आहे.


या संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की, या संस्थेच्या स्थापनेनंतर आपल्याला खूप आनंद झाला आहे. यासाठी आपण ही संस्था स्थापन केली त्याचे फलित समोर येत आहे. सर्व गायकांना त्यांच्या रॉयल्टीचा हक्क मिळत आहेत, सर्वांचे याबद्दल अभिनंदन. इसराच्या संचालक मंडळामध्ये आशा भोसले या अध्यक्ष इमिरेट्स आहेत. तर अनुप जलोटा हे अध्यक्ष असून सोनू निगम, सुरेश वाडकर, अलका याग्निक, पंकज उदास, कुमार सानू, शैलेंद्रसिंग आणि जसपिंदर नरुला यांचा कार्यकारणीत समावेश आहे.


'इसरा'चे अध्यक्ष असलेल्या संजय अनुप जलोटा यांनी सांगितले की संगीतकारांनाही 'इसामरा'मध्ये समाविष्ट करण्यात आले असून याचा आम्हाला आनंद होत आहे. मला आता अभिमान वाटतो की आमच्या संगीतकार बंधूंनाही 'इस्मरा'कडून रॉयल्टी मिळण्यास सुरुवात होईल आणि ही एक ऐतिहासिक बाब आहे. तर यावेळी बोलताना सोनू निगम म्हणाले की, ही भारताच्या गायक आणि संगीतकारांसाठी एक विशाल झेप असून इसरासह सर्व कलाकार आता परदेशी कलाकारांना ज्या प्रकारे रॉयल्टी मिळते त्याप्रमाणे मिळवू शकतात. शेवटी आपले स्वप्न सत्यात उतरले आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. 'ड्रामा क्वीन' राखी सावंतनं किंग खानला केलेल्या विचित्र मागणीमुळं झाली ट्रोल

2.अगस्त्य नंदानं कथित गर्लफ्रेंड सुहानाबरोबर कापला वाढदिवसाचा केक, व्हिडिओ व्हायरल

3.सलमान खानची भाची अलीझेह अग्निहोत्रीच्या डेब्यू चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग

ABOUT THE AUTHOR

...view details