मुंबई - मराठी बिग बॉसच्या घरात आज स्पर्धकांना मोठा धक्का देण्याचे काम बिग बॉस करणार आहे. आज एक नाही तर दोन स्पर्धकांना घरातून बाहेर पडावे लागणार आहे. शोच्या प्रोमोमध्ये बिग बॉस सर्व स्पर्धकांना आपआपल्या नावाची पाटी घेऊन तयार राहण्याचे आवाहन करताना दिसत आहे. दोन स्पर्धक जाणार म्हटल्यावर स्पर्धकांच्या चेहऱ्यावर तणावही पाहायला मिळत आहे.
बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धकांना धक्का, घरातून दोन स्पर्धकांची होणार गच्छंती - बिग बॉस मराठी लेटेस्ट न्यूज
मराठी बिग बॉसच्या घरात आज एक नाही तर दोन स्पर्धकांना घरातून बाहेर पडावे लागणार आहे. शोच्या प्रोमोमध्ये बिग बॉस सर्व स्पर्धकांना आपआपल्या नावाची पाटी घेऊन तयार राहण्याचे आवाहन करताना दिसत आहे. दोन स्पर्धक जाणार म्हटल्यावर स्पर्धकांच्या चेहऱ्यावर तणावही पाहायला मिळत आहे.
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज दोन जिवलग मैत्रिणींमध्ये कडाक्याचे भांडण होणार आहे . काल यशश्रीने सदस्यांवर केलेला प्रॅन्क तिच्यावरच उलटला. प्रसाद तिच्यावर कमालीचा नाराज झालाय. त्यांनतर अमृता धोंगडेने देखील प्रसादची खिल्ली उलडवली. ज्यामध्ये तिने तेजस्विनीला मध्ये आणले ज्यावरून अमृता धोंगडे आणि प्रसाद मध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. आणि या सगळ्यात प्रसाद बरोबर आहे असे कुठेतरी तेजस्विनीचे म्हणणे आहे. आज याच मुद्द्यावरून, झाल्या प्रकारावरून दोघींमध्ये कडाक्याचे भांडणं होणार आहे.
हेही वाचा - विजय देवरकोंडाने घेतली अवयवदानाची शपथ व्हिडिओ