मुंबई- बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोणते सदस्य नॉमिनेट होणार हे आजच्या भागात कळणार आहे. पण आज बिग बॉस मराठीच्या घरात होणार आहे एक धिंगाना. घरामधील सदस्यांना गमवाव्या लागणार आहेत त्यांच्या काही मौल्यवान वस्तू... कारण घरात रंगणार आहे “सोसल तितकंच सोशल” - हे साप्ताहिक कार्य ! या टास्कमध्ये सदस्यांची कसोटी लागत असते. कारण यात त्यांच्या काही महत्वाच्या गोष्टी पणाला लागणार आहेत. आता टीम्स सदस्यांना कोणत्या गोष्टींचे बलिदान द्यायला सांगणार हे आजच्या भागामध्ये कळेल.
आपल्या मौल्यवान वस्तू हे स्पर्धक सहजासहजी देण्यासाठी तयार होतील का? हा देखील मोठा प्रश्न आहे. परंतु हे आव्हान सदस्य कसे पूर्ण करतील ? हे बघणेदेखील उत्सुकतेचे असणार आहे.
बिग बॉस मराठी 'सोसल तितकंच सोशल' - साप्ताहिक कार्य
बिग बॉस मराठीच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये तेजस्विनी आणि अपूर्वा पदार्थ खाताना दिसतं आहे आणि तो काही तितकासा स्वादिष्ट नसणार हे आपल्याला माहितीच आहे. तर अक्षय रोहितला सांगताना दिसणार आहे की रुचिराचा फोटो फाड आणि बॉटल आहे ती नष्ट कर. तर दुसरीकडे स्नेहलता सदस्यांचे कपडे फाडताना आणि हेअर ड्रायर नष्ट करताना दिसत आहे. विकास आणि प्रसादला अक्षयने खूप मोठं चॅलेंज दिले - त्याचे म्हणणे आहे डोक्यावर ट्रीमर फिरवून दाखवा... विकास - प्रसाद ते करताना दिसत आहेत... प्रसाद हे करताना नाखूष असला तरी त्याने हे आव्हान स्वीकारले आहे... बघूया टास्कमध्ये पुढे काय काय होणार ? सदस्यांच्या कोणकोणत्या गोष्टी पणाला लागणार हे आजच्या भागामध्ये दिसून येईल.
हेही वाचा -''मोठे नुकसान...,'' म्हणत रजनीकांत, चिरंजीवीनी वाहिली कृष्णा यांना श्रध्दांजली