मुंबई : झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भलत्याच पसंतीस पडल्या आहेत. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे सिद्धार्थ जी साकारतोय अभिनेता हार्दिक जोशी. तुझ्यात जीव रंगला मधील राणा असो किंवा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेतील सिद्धार्थ या भूमिकांनी त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. हार्दिक त्या भूमिकेला अनुसरून आपली शरीरयष्टी आणि देहबोली याकडे देखील लक्ष देतो. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे आणि या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी हा प्रेक्षकांचा आवडता आहे.
आपल्या रुटिनबद्दल हार्दिक सांगतो की, "खरं तर आजच्या काळात आरोग्याची काळजी घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे दैनंदिन मालिका करताना आपल्याला स्वतःसाठी वेळ काढावा लागतो. त्यामुळे मी जरी मी मालिका करत असलो तरी मी जसा वेळ मिळेल तसं जिमला जातो. शिफ्टच्या आधी किंवा नंतर दीड ते दोन तास वर्कआउट करतो. जर अगदीच वेळ ऍडजस्ट होत नसेल तर सीनच्या मध्ये जर फावला वेळ असेल तर आराम न करता मी तेव्हा जिमला जातो आणि परत येऊन शूटिंग करतो. माझ्यासाठी फिटनेस खूप महत्वाचं आहे. मी अभिनय क्षेत्रात आहे म्हणून नाही तर वैयत्तिक आयुष्यात देखील फिटनेस खूप महत्वाचा आहे सर्वांसाठीच. कारण जर आपण फिट असू तर आयुष्य हिट आहे असं मी नेहमी म्हणतो."
Hardik Joshi : 'सीनमधील रिकाम्या वेळेत करतो व्यायाम' हार्दिकने सांगितला फीटनेस मंत्रा - तुझ्यात जीव रंगला
झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिकेत काम करणाऱ्या अभिनेता हार्दिक जोशी याने आपला फीटनेस मंत्रा चाहत्यांसोबत शेयर केला आहे.
Hardik Joshi