मुंबई- चित्रपट निर्माते हंसल मेहता अॅपलॉज एंटरटेनमेंटच्या 'गांधी' या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत. प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांच्या 'गांधी बिफोर इंडिया' आणि 'गांधी-द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड' या दोन पुस्तकांवर आधारित असेल. या मालिकेत प्रतीक गांधी महात्मा गांधीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'स्कॅम 1992' आणि 'बाई' नंतर हंसलचा प्रतीकसोबतचा हा तिसरा प्रोजेक्ट आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या कालखंडावर आधारित, अॅप्लॉज जागतिक प्रेक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 'गांधी'ची निर्मिती करेल आणि अनेक भारतीय आणि परदेशी ठिकाणी त्याचे विस्तृत चित्रीकरण केले जाईल.
या प्रकल्पाबद्दल उत्सुक असलेले हंसल म्हणाले, "जेव्हा तुम्ही महात्मा गांधींसारख्या ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलता, तेव्हा एक चित्रपट निर्माता म्हणून तुमच्यावर आधीच खूप मोठी जबाबदारी असते. मालिकेसोबतची आमची दृष्टी ती सत्यात उतरवण्याची आहे. रामचंद्र गुहांनी केलेल्या कामावरुन त्यांचे खरेखुरे जीवन मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. समीर आणि त्याची अॅपलॉज टीमसोबत हा प्रवास करण्यासाठी मी उत्सुक झालो आहे."
'गांधी' मालिकेचे दिग्दर्शन करणार हंसल मेहता "महात्मा गांधींची कथा ही केवळ एका महान व्यक्तीची कहाणी नाही; ती एका राष्ट्राच्या जन्माची आणि इतर अनेक नाट्यमय व्यक्तिमत्त्वाचीही कथा आहे, ज्यांनी गांधींसोबत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. आम्हाल भारताची ही महत्त्वाची कहाणी सांगण्याची आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा समृद्ध इतिहास एका खोलवर बहु-सीझन मालिकेमध्ये जिवंत करण्याची संधी मिळाली आहे. या विशाल कथेला समान उंचीचा चित्रपट निर्माता हवा होता आणि हंसलमध्ये आम्हाला आमचा शोध लागला आहे.," असे समीर नायर, सीईओ अॅप्लॉज एंटरटेनमेंट यांनी शेअर केले.
"गांधीची निर्मिती हा एक भावनिक अनुभव असेल, आणि जेव्हा या विशाल आणि महत्त्वाची मालिका तयार केली जाते, तेव्हा त्याच्या निर्मितीवर खरोखर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची गरज असते. हंसल मेहताची दिग्दर्शनाची दृष्टी, प्रतीकचा सहज सूक्ष्म अभिनय आणि सिद्धार्थ बसू याचे सर्जनशील प्रक्रियेत सामील होणे यासह गांधीजींचा आणि भारताचा प्रवास जागतिक प्रेक्षकांपर्यंत आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,” असे समीर पुढे म्हणाले. 'भारतीय टेलिव्हिजन क्विझिंगचे जनक' म्हणून ओळखले जाणारे सिद्धार्थ बसू हे ऐतिहासिक सल्लागार, तथ्यात्मक सल्लागार आणि सर्जनशील सल्लागार म्हणून या प्रोजेक्टमध्ये सामील झाले आहेत.
हेही वाचा -Ranveer Singh Nude Photoshoot : अभिनेता रणवीर सिंगच्या अडचणीत होणार वाढ, पोलीस पाठविणार समन्स