महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Golden Boys in Bigg Boss 16 : 'गोल्डन बाॅईज' जगतात लक्झरी लाइफ, घालतात कोटींचे सोने; बिग बॉस 16 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री - सनी नानासाहेब वाघचोरे

बिग बॉस 16 च्या नवीन भागामध्ये, दोन नवीन स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. ज्याला बिग बॉस पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणतात. दोन्ही स्पर्धक घरात प्रवेश करताच सर्वांनाच धक्का बसला. भरपूर किलो सोने परिधान केलेल्या दोन स्पर्धकांनी नुकतीच एन्ट्री केली असून हे दोघे कोण आहेत असा सवाल प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत आहे. चला तर गोल्डन बॉईजबद्दल जाणून घेवूया. (Golden Boys in Bigg Boss 16, Golden guys bigg boss 16 wild card entry)

Golden Boys in Bigg Boss 16
बिग बॉस 16 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री

By

Published : Nov 30, 2022, 2:35 PM IST

मुंबई :बिग बॉस 16 शोसाठी लोकांमध्ये प्रचंड क्रेझ असतानाच आता त्यात वाईल्ड कार्ड एन्ट्रीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. गोल्डन बॉईजने बिग बॉसच्या घरात किलोने सोने परिधान करून प्रवेश केला. गोल्डन बॉय सनी नानासाहेब वाघचोरे आणि संजय गुजर यांची रंगतदार स्टाईल पाहून चाहत्यांच्या मनात पहिला प्रश्न आला की हे आहे तरी कोण? तर हे दोघेही सोशल मीडिया स्टार आहेत आणि त्यांना गोल्डन बॉय म्हणतात कारण दोघेही अनेक किलो सोने घालतात. त्याची ओळख ही त्याच्या कपड्यांसह अनेक किलो सोन्यामुळे निर्माण झाली आहे. त्याचे हे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहेत. त्यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील अवाक व्हाल. (Golden Boys in Bigg Boss 16, Golden guys bigg boss 16 wild card entry)

गोल्डन बॉय एकत्र राहतात : हे दोघेही पुण्याचे रहिवासी आहेत. गोल्डन बॉय सनी नानासाहेब वाघचोरे आणुि संजय गुजर लहानपणापासून एकत्र आहेत आणि दोघांनाही लहानपणापासूनच सोने घालण्याची आवड आहे. ते मित्र असून त्यांच्यात बंधुप्रेम देखील आहे. ते नेहमी एकत्र राहतात. एका रिपोर्टनुसार, सनी एकावेळी सुमारे 3 किलो सोने घालतो. सनी आणि बंटी हे चित्रपट फायनान्सर आणि निर्माते आहेत. तो अनेक प्रसंगी सलमान खान, विवेक ओबेरॉय आणि इतर अनेक सेलिब्रिटींसोबत दिसतो.


नुकतीच लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग खरेदी केली : दोघांनाही सोन्याचे सामान खूप आवडते. त्यांच्याकडे दागिन्यांमध्ये जाड सोन्याची साखळी जसे की चेन, मोठ्या अंगठ्या, डायमंड रिंग, ब्रेसलेट आणि बरेच काही आहे. मोबाईल आणि इतर गॅजेटही सोन्याने मढवलेले आहेत. मोबाईलचे कव्हरही सोन्याचे आहे. कारवर सोन्याचे रॅपिंग आहे आणि बुटांवर सोन्याचे काम केले आहे. ते जो चष्मा घालतात त्यावरही सोन्याची कारागिरी असते. घड्याळ्याची साखळीही सोन्याची आहे. लोकप्रियतेमुळे, कधीकधी त्यांच्याभोवती गर्दी असते, म्हणून त्यांच्याकडे नेहमीच अंगरक्षक असतात. दोघांनीही नुकतीच लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग खरेदी केली आहे. ही कार अनेक प्रसिद्ध फिल्मी व्यक्तींसोबतही दिसत आहे. याशिवाय त्याच्याकडे लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग एल332 कार देखील आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 2.8 कोटी रुपये आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details