महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

दिग्दर्शक रोहित शेट्टी सेटवर जखमी, हैदराबादच्या कामिनेनी रुग्णालयात दाखल - इंडियन पोलिस फोर्स या डेब्यू मालिकेचे शूटिंग

Director Rohit Shetty hospitalised :शूटिंग दरम्यान रोहित शेट्टी जखमी झाला आहे. रोहित शेट्टीला हैदराबादच्या कमिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी सेटवर जखमी
दिग्दर्शक रोहित शेट्टी सेटवर जखमी

By

Published : Jan 7, 2023, 4:09 PM IST

Updated : Jan 9, 2023, 2:18 PM IST

हैदराबाद - बॉलिवूडमधील अॅक्शनपटांचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. रोहित शेट्टी शनिवारी (७ जानेवारी) शूटिंगदरम्यान जखमी झाला होता. या अपघातात रोहित शेट्टी जखमी झाला. अपघातानंतर दिग्दर्शकाला हैदराबादच्या कमिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो त्याच्या पहिल्या वेब-सीरिज 'इंडियन पोलिस फोर्स'साठी शूटिंग करत होता.

असे सांगितले जात आहे की, दिग्दर्शकाने अलीकडेच हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये इंडियन पोलिस फोर्स या डेब्यू मालिकेचे शूटिंग सुरू केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारचा पाठलाग करताना रोहित शेट्टी जखमी झाला. अपघातानंतर लगेचच रोहितला कामिनेनी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

असे सांगितले जात आहे की एक शक्तिशाली सीन तयार करण्यासाठी एक मोठा सेट तयार करण्यात आला होता, जिथे रोहित शेट्टी कार चेस सीन शूट करत होता. याशिवाय या सेटवर अनेक हाय-ऑक्टेन अॅक्शन आणि स्टंट सीन्स होणार होते. ताज्या माहितीनुसार, रोहित शेट्टीला हातावर शस्त्रक्रिया करून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जाणून घ्या 'इंडियन पोलिस फोर्स' - गोलमाल सिरीज, सिंघम सिरीज, चेन्नई एक्स्प्रेस, सिम्बा आणि सूर्यवंशी यांसारख्या अ‍ॅक्शन-पॅक चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा रोहित शेट्टी त्याच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या डेब्यू वेबसिरीजसह डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवणार आहे. या मालिकेत शिल्पा शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका Amazon Prime Video वर स्ट्रीम होईल.


Last Updated : Jan 9, 2023, 2:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details