मुंबई - टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडी शो तारक मेहता का उल्टा चष्मा सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडे जुन्या तारक मेहताने हा शो सोडल्याची बरीच चर्चा रंगली होती. आता आणखी एक धक्कादायक बातमी येत आहे की दिशा वकानी म्हणजेच दयाबेनला कॅन्सर झाला आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. पण ही बातमी अफवा असल्याचा खुलासा जेठालाल यांनी केला आहे.
दिशा वकानीला घशाचा कर्करोग झाल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे. दिशाला घशातून आवाज काढण्यामुळे त्रास होत होता अशाही चर्चा रंगल्या आहेत. मात्र मालिकेमध्ये दयाबेनच्या पतीची भूमिका करणाऱ्या जेठालाल यांनी बातमीचे खंडन केले आहे. मीडिया हाऊसशी संवाद साधताना दिलीप जोशी यांनी सांगितले की, सकाळपासून त्यांना सतत फोन येत आहेत. दिलीप जोशी म्हणाले की, प्रत्येक वेळी कोणतीही हास्यास्पद बातमी पसरवायची गरज नाही. मी एवढेच म्हणेन की या सर्व अफवा आहेत आणि त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.