दिल्लीराजू श्रीवास्तव यांच्या मेंदूतील तीनपैकी एक नस अजूनही काम करत नाही. आता परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून डॉक्टर न्यूरोफिजिओथेरपीची मदत घेत आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, राजूची तब्येत सुधारत असली तरी तो अजूनही व्हेंटिलेटरवर Comedian Raju Srivastavas health improved आहे.
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या १५ दिवसांपासून दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल आहेत. राजू यांना १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना अजून भान आलेले नाही. येथे चाहते त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव कोमात आहेत आणि आता त्यांच्या उपचारात न्यूरोफिजिओथेरपीची मदत घेतली जात आहे. यासोबतच राजूला भानावर आणण्यासाठी शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकवला जात Raju Srivastava and Amitabh Bachchan आहे.